Drishyam 2 actor sidharth bodke talks about his success and popularity
Drishyam 2 actor sidharth bodke talks about his success and popularity Google
मनोरंजन

Drishyam 2:'दृश्यम 2' मधील अभिनेता सिद्धार्थ बोडकेला त्याचे 25 लाख मिळाले का? काय आहे प्रकरण? जाणून घ्या..

प्रणाली मोरे

Drishyam 2: या वर्षात बंपर कमाई करणारा 'दृश्यम 2' अजूनही चर्चेत आहे अन् बॉक्सऑफिसवर टिकून आहे. सिनेमात असलेल्या अनेक छोट्या बड्या व्यक्तीरेखांमुळे सिनेमाला यश मिळाल्याचं देखील बोललं जात आहे. चाहत्यांनीच नाही तर अनेक बड्या-बड्या कास्टिंग डायरेक्टर्सनी आपल्या फेव्हरेट लिस्टमध्ये 'दृश्यम 2' मधील कलाकारांचे नाव सामिल केले आहे.

यामध्येच 'दृश्यम 2' मध्ये डेव्हिड ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या सिद्धार्थ बोडकेचं काम देखील नोटीस केलं गेलं आहे. सिद्धार्थनं नुकत्याच एका मुलाखतीत सिनेमाशी संबंधित अनेक इंट्रेस्टिंग किस्से सांगितले आहेत.(Drishyam 2 actor sidharth bodke talks about his success and popularity)

सिद्धार्थ म्हणाला की,''मला कास्टिंग टीमकडून कॉल आला तेव्हा शिवच्या भूमिकेसाठी ऑडिशन झालं होतं. शिवची भूमिका म्हणजे जो विजय साळगावकरचा शेजारी असण्यासोबतच अंडरकॉप एजंट असतो. माझ्या ऑडिशननंतर मला शिवच्या व्यक्तिरेखेसाठी निवडलं देखील गेलं. पण पुन्हा मला कॉल आला आणि अजून एका व्यक्तिरेखेच्या ऑडिशनसाठी बोलावलं गेलं. आणि ती दुसरी ऑडिशन दिल्यानंतर मी 'दृश्यम 2' चा डेव्हिड बनलो. हैराण करणारी गोष्ट ही आहे की हा माझा पहिला बॉलीवूड सिनेमा होता आणि बड्या बॉलीवूड स्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळाल्यानंतर मी नर्व्हस होण्याऐवजी एक्सायटेड झालो होतो. माझं स्वप्न होतं...की एक संधी मिळावी आणि मी स्वतःला सिद्ध करावं. त्यामुळे तेव्हा दडपण घेऊन मी डेव्हिड हवा तसा साकारू शकलो नसतो. तब्बू,अजय आणि अक्षय यांनी मला शूटिंग दरम्यान खूप सहाय्य केल्याचंही सिद्धार्थ म्हणाल''.

''डेव्हिड ची व्यक्तीरेखा साकारल्यानंतर लोक मला अजूनही एकच प्रश्न विचारत आहेत,'तुला 25 लाख मिळाले का' मित्र आणि ओळखीचेच नाहीत तर सोशल मीडियावरही मला असा प्रश्न विचारत अनेकजण मेसेज करत आहेत. खूप मस्त वाटतं की लोकांनी मला एवढ्या सगळ्या बड्या स्टार्समध्ये नोटीस केलं. सिनेमाच्या यशानं आपला आत्मविश्वास वाढवल्याचं देखील सिद्धार्थ म्हणाला''. 'दृश्यम 2' नंतर सिद्धार्थला बॉलीवूडच्या आणखी 2 ते 3 सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या आहेत. त्यात एक वेब सिरीज आणि दोन सिनेमे आहेत.

हेही वाचा- संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

सिद्धार्थ मुलाखतीत पुढे म्हणाला की,''दृश्यमचा पहिला भाग मी पाहिला नव्हता. कोरोना दरम्यान घरी बसलो असताना मित्र म्हणाला म्हणून पहिला भाग डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहिला. आणि माझं नशीब इतकं ग्रेट की ,'दृश्यम'चा पहिला भाग पाहिल्यानंतर दहा दिवसांनी मला 'दृश्यम 2' च्या ऑडिशनसाठी कॉल आला''.

सिद्धार्थ बोडकेच्या एकंदरीत करिअरवर नजर टाकली तर त्याचं बॅकग्राउंड मराठी नाटकांचं. नाशिकमधून मुंबईत तो अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी आला. दोन मराठी मालिकांमध्ये देखील त्यानं काम केलं आहे.तसंच, 'गुम है किसी के प्यार में' या हिंदी मालिकेत त्यानं खलनायक साकारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT