The Kashmir Files News esakal
मनोरंजन

Kashmir Files: 'श्रीनगरमध्ये आलात तर संपवल्याशिवाय राहणार नाही!'

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्ंमिर फाईल्सची (The Kashmir Files) सध्या सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Movies: दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या द काश्ंमिर फाईल्सची (The Kashmir Files) सध्या सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या चित्रपटानं (Director Vivek Agnihotry) देशभरातील चित्रपट चाहत्यांची मनं जिंकली आहे. (Entertainment news) थिएटरमध्ये मोठ्या संख्येनं प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटानं प्रचंड कमाई केली आहे. एकीकडे त्यावरुन वादही होताना दिसतो आहे. निर्माती व अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी हा चित्रपट तयार करताना आपल्याला सामोऱ्या जाव्या लागलेल्या अडचणींविषयी सांगितलं आहे. सहाव्या दिवशी या चित्रपटानं 19.30 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. लवकरच हा चित्रपट शंभर कोटींचा व्यवसाय करेल असे सांगितले जात आहे.

दरम्यान काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावर वेगळ्या प्रकारे चाहत्यांना चित्रपट पाहण्यासाठी आवाहन केले आहे. त्यांनी एक पत्र व्हायरल केले आहे. 90 च्या दशकांत काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्याय आणि अत्याचारावर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. काश्मिरी पंडितांना करावे लागलेले स्थलांतर, त्यांचे झालेले हाल या विषयांना चित्रपटातून बोलतं करण्यात आले आहे. यावेळी अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावरुन एक पत्र व्हायरल केले आहे. त्यामध्ये काश्मिरी पंडितांना कशाप्रकारे जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या. हे त्यांनी सांगितलं आहे. 1990 मध्ये एका कश्मिरी पंडिताला पत्र पाठवण्यात आले होते. त्यात त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

काश्मिरी पंडितांनो सावधान, तुम्ही जिथे असाल तिथून माघारी फिरा, तुम्ही कुणाचे हस्तक आहात हे सारं आम्हाला माहिती आहे. तेव्हा आता काश्मिरमध्ये राहु नका. तुमच्या तीन मुलांसमवेत याठिकाणाहून निघुन जा. नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही. अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्याचे त्या पत्रातून अग्निहोत्री यांनी सोशल मीडियातून नेटकऱ्यांना सांगितलं आहे. यापूर्वी पल्लवी जोशी यांनी देखील आपल्याला शुटिंगच्या वेळी त्रास देवून अजब फतवे काढल्याचे सांगितले होते. याप्रसंगी अग्निहोत्री यांनी देशाचे पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहे. काश्मिरविषयीचे सत्य त्यांच्यामुळे जगासमोर आल्याचे सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Hindu Genocide: बांगलादेशमध्ये हिंदू पोलिस अधिकाऱ्याला जिवंत जाळलं; हल्लेखोर पोलिस ठाण्यात घुसले

Shrikant Deshpande: ज्येष्ठ नागरिक रिकामे असतात, त्यांना प्रचारासाठी घ्या: माजी आमदार श्रीकांत देशपांडे; वादग्रस्त विधान चर्चेत!

Latest Marathi News Live Update : महायुतीच्या प्रचाराचा वरळीतून शुभारंभ

Bhandara News: थरारक घटना! चालकाचे नियंत्रण सुटलं अन कार थेट तलावात कोसळली; पाेलिसांनी जीव धाेक्यात घालून वाचवले दोघांचे प्राण..

India Hydrogen Train : मोठी बातमी! देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनच्या लाँचिंगचा मुहूर्त आला समोर

SCROLL FOR NEXT