mirabai chanu
mirabai chanu  team esakal
मनोरंजन

ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव गाजवणाऱ्या मीराबाई चानुवर 'बायोपिक'

युगंधर ताजणे

मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमध्ये (tokiyo olympics) रौप्य पदक जिंकुन गौरवास्पद कामगिरी मीराबाई चानुनं (mirabai chanu) केली आहे. देशवासियांनी तिच्या कौतूकाचा वर्षाव केला. भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या मीराबाईवर बक्षीसांची सध्या खैरात होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी एका पिझ्झा कंपनीनं तिला लाईफ टाईम पिझ्झा देणार असल्याचे सांगितले. त्यापूर्वी मिराबाईनं आपल्याला पिझ्झा फार आवडत असून त्याबाबत एक व्टिट केलं होत. अभिनेता आर माधवन यानं मीराबाईच्या त्या व्हायरल झालेल्या एका फोटोबाबत संवदेनशील प्रतिक्रिया दिली होती. त्या फोटोमध्ये मीराबाई किती गरिबीत राहते असे दिसून आले. (bollywood film will made on mirabai chanu who brought indias name in olympics yst88)

सध्या मीराबाई लाईमलाईट (mirabai chanu) मध्ये आली आहे त्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे तिच्या आयुष्यावर चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. मणिपुरी भाषेत हा चित्रपट तयार केला जाणार आहे. त्याविषयीची माहिती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. याबाबत मीराबाई आणि इंफाळच्या सेऊती फिल्म प्रॉडक्शनमध्ये एक करार करण्यात आला आहे. इंफाळच्या पूर्वेला असणाऱ्या काकचिंग गावात त्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

याविषयी अधिक माहिती त्या प्रॉडक्शन हाऊसचे अध्यक्ष मनाओबी एम एम यांच्या मार्फत एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यांनी सांगितलं की, हा चित्रपट इंग्रजी आणि भारतातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. मनाओबी यांनी पीटीआयला माहिती दिली आहे. त्यात ते म्हणतात, आता आम्ही मीराबाईच्या बायोपिकमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीच्या शोधात आहोत. त्यासाठी ऑडिशनला सुरुवात करणार आहे. आम्हाला आशा आहे की, लवकरच आम्हाला मीराबाईची भूमिका करणारी चांगली अभिनेत्री मिळेल.

मीराबाईच्या चेहऱ्याशी साम्य असणारी अभिनेत्री आम्हाला हवी आहे. त्या अभिनेत्रीला सुरुवातीला प्रशिक्षण दिले जाणार आहे. मीराबाईच्या आयुष्यातील जे वेगवेगळे पैलु आहेत त्याची माहिती तिला दिली जाणार आहे. जेणेकरुन तिला मीराबाई साकारण्यास मदत व्हावी. असंही निर्मात्यांनी यावेळी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

Priyanka Gandhi : मतांसाठी गांधी आडनावाचा वापर; मोहन यादव यांची प्रियांका गांधींवर टीका

Fact Check: मोदींच्या कोल्हापूरमधील सभेला विक्रमी गर्दी? Viral Photo महाराष्ट्र नव्हे नायजेरिया, चीनचे

SCROLL FOR NEXT