films in 2021 
मनोरंजन

नवीन वर्षाच्या सुरूवातीला प्रेक्षकांसाठी 'या' खास सिनेमांची मेजवानी

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  २०२१ या नवीन वर्षात लोकांसाठी मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. २०२० मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक सिनेमांनी नशीब आजमावलं. तर वेगवेगळ्या विषयांवरील वेब सीरीज रिलीज झाल्या. आता थिएटर सुरू झाल्याने लोक सिनेमे पाहण्यासाठी थिएटरकडे वळत आहेत. जानेवारी महिन्यात अनेक सिनेमे थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहेत. जाणून घेऊया कोणकोणते सिनेमे वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात रिलीज होणार आहेत. 

रामप्रसाद की तेहरवी
नसीरुद्दीन शाह आणि सुप्रिया पाठक यांचा 'रामप्रसाद की तेहरवी' हा सिनेमा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रदर्शित झाला आहे. या सिनेमातून सीमा पाहवा दिग्दर्शनात उतरली आहे. सिनेमात कोंकणा सेन, विक्रांत मेसी, विनय पाठक आणि मनोज पाहवा नसीरुद्दीन शाह आणि सुप्रिया पाठक यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत.

12 ओ क्लॉक
राम गोपाल वर्माचा '12 ओ क्लॉक' हा सिनेमा 8 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमात मिथुन चक्रवर्ती, मकरंद देशपांडे, दिव्या जगदाळे, मानव कौल, अली असगर, दलीप ताहिल हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा एक हॉरर सिनेमा आहे. राम गोपाल वर्मा बऱ्याच दिवसांनंतर या हॉरर सिनेमात झळकणार आहेत.

हाथी मेरे साथी
राणा दग्गुबाती आणि पुलकित सम्राटचा सिनेमा 'हाथी मेरे साथी' हा सिनेमा 15 जानेवारीला रिलीज होणार आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर तुमच्या मनात प्राण्यांविषयीचं प्रेम वाढेल.

मेरे देश की धरती
दिव्येंदु शर्मा आणि अनुप्रिया गोयकाचा सिनेमा 'मेरे देश की धरती' हा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. हा सिनेमा 22 जानेवारीला रिलीज होणार आहे. 'मेरे देश की धरती' या सिनेमात देशातील शेतकऱ्यांची स्थिती दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा 2020 मध्ये रिलीज होणार होता पण लॉकडाऊनमुळे रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली होती.

bollywood films will come out at the beginning of the new year   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Solapur News: सोलापूर काँग्रेसच्या मातृसत्ता हरपली! माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन

Uddhav Nimse : राहुल धोत्रे खून प्रकरण: २५ दिवसांनंतर उद्धव निमसे अखेर पोलिसांच्या ताब्यात

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT