Kajol-Shahrukh on Nysa and Aryan Khan Esakal
मनोरंजन

Viral Video: 'जर आर्यन खान सोबत पळून गेली नीसा देवगण?', काजोलच्या भन्नाट उत्तरानं शाहरुखची बोलती झालेली बंद..

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या चॅट शो मध्ये त्यानं काजोल-शाहरुखला हा थेट प्रश्न २००७ मध्ये केला हातो. जेव्हा नीसा आणि आर्यन दोघेही लहान होते.

प्रणाली मोरे

Viral Video: काजोल आणि शाहरुख खान हिंदी सिनेमातील पडद्यावरच्या बेस्ट कपलपैकी एक आहेत. पडद्यावर दोघांची जोडी धमाल आणते. पण भविष्यात यांच्या मुलांच्या माध्यमातून दोघांमध्ये काही नातं जोडलं गेलं तर..याचा त्यांचे चाहते म्हणून कधी विचार केलाय का तुम्ही? काय होईल जर शाहरुखचा मुलगा आर्यन खान आणि काजोलची मुलगी नीसा देवगण यांच्यात प्रत्यक्ष आयुष्यात 'कुछ कुछ होता है' सुरू झालं तर?

आपण इतका विचार नक्कीच केला नसेल पण करण जोहरनं हे स्वप्न खूप आधी पाहिलं होतं. एवढंच नाही तर 'कॉफी विथ करण'च्या एका भागात त्यानं शाहरुख-काजोल एकत्र आले असताना दोघांना विचारलं देखील होतं की ,जर आर्यन खाननं नीसाला पळवलं तर?(Bollywood: if Aryan khan elopes with nysa devgan when shahrukh khan wasscared about kajol answer in koffee with karan)

करण जोहरच्या चॅट शो मधील एका एपिसोड मध्ये काऊचवर 'कुछ कुछ होता है' स्टार्स शाहरुख खान,काजोल आणि रानी बसले होते. रॅपिड फायर राऊंड दरम्यान करण जोहरनं आर्यन खान आणि नीसा देवगण शी संबंधित एक प्रश्न काजोलला विचारला होता.

यावर काजोलची प्रतिक्रिया खूपच मजेशीर होती. रॅपिड फायर राऊंड होता त्यामुळे काजोलनं पटकनं याचं उत्तर दिलं होतं. पण मजेदार गोष्ट ही होती की शाहरुख आधी प्रश्न विचारल्यावर तर नुसता हसत होता पण नंतर त्यानं म्हटलं की प्रश्न ऐकून त्याची बोलतीच बंद झाली. जसं त्याच्याजवळ या प्रश्नाचं काही उत्तरच नाही.

हेही वाचा: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

२००७ मधील हा एपिसोड आहे. होस्ट म्हणून करणने काजोलला विचारलं..'१० वर्षानंतर आर्यन खान नीसाला घेऊन पळून गेला..आणि हे जेव्हा तुला कळेल तेव्हा तू कशी रिअॅक्ट करशील?' काजोलनं सेकंदात या प्रश्नाचं उत्तर दिलं,''मी तर म्हणेन की 'दिलवाले दूल्हे ले जायेंगे..''

काजोल हे उत्तर देत जोरजारात हसू लागली. शाहरुख देखील हसायला लागला. पण मग तो म्हणाला की या विचारानं देखील मला स्ट्रेस आला आहे.

शाहरुख खान म्हणाला,''मी तर हा विचार करूनच चिंतेत सापडलो आहे. काजोल सोबत नातं जोडायचं या विचारानेच मी घाबरलो आहे''. शाहरुखचं हे बोलणं ऐकून काजोल,रानी ..एवढंच नाही तर करण जोहरलाही हसू आवरेना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT