ShahRukh Khan
ShahRukh Khan 
मनोरंजन

'खातो भारताचं, गुणगान पाकिस्तानचं': शाहरुखवर बंदीची मागणी

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. त्याचे कारण शाहरुख हा पाकिस्तानविषयीचे गो़डवे गातो असा आरोप त्यात करण्यात आला आहे. यापूर्वी त्यानं अनेकदा आपल्या चित्रपटांतून अशा प्रकारे पाकिस्तान देशाचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला होता. अशी प्रतिक्रिया त्याच्या चाहत्यांनी व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शाहरुखची तुलना तालिबान्यांशी केली आहे. त्यामुळे त्याच्याविरोधातील मतांमध्ये वाढ होताना दिसत आहे. काल नसीरुद्दीन शहा यांनी बॉलीवूडमधील खान मंडळींवर टीका केली होती. त्यात त्यांनी शाहरुख आणि इतर खान मंडळी हे कधीच सध्याच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य़ करताना दिसत नाही. याकडे शहा यांनी लक्ष वेधलं होतं.

आता सध्या काही वेळेपासून शाहरुख हा सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. त्याच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्याचे कारण त्यानं पाकिस्तानच्या समर्थनार्थ घेतलेली भूमिका आणि तालिबानी विचारधारेची केलेली प्रशंसा असल्याचे सांगण्यात आले आहे. धार्मिक भावना दुखावणे आणि त्या भडकावणे बॉलीवूडनं आता बंद करावं. अशा प्रकारच्या प्रतिक्रियाही यावेळी दिसून आल्या आहेत. काहींनी बॉलीवूडवर बंदी घालण्याऐवजी शाहरुखच्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्याच्या आतापर्यतच्या राजकीय, सामाजिक, वक्तव्यांचा यावेळी समाचार घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूडमधील कलाकारांविषयी वातावरण वेगळं असल्याचे दिसून आले आहे. यात प्रमुख भूमिका ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी घेतल्याचे दिसून आले आहे. जेव्हा एखादा सामाजिक, धार्मिक, राजकीय मुद्दा येतो तेव्हा शाहरुख, सलमान आणि आमिर खान हे तिन्ही खान मंडळी कुठलीच भूमिका घेत नाही. या शब्दांत नसीरुद्दीन शहा यांनी टीका केली आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूला खान अभिनेत्यांच्या चाहत्यांनी नसीरुद्दीन शहा यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ज्यावेळी त्या तीन मुद्द्यांवर ठाम भूमिका घेण्याची वेळ येते तेव्हा ते तीन खान काही बोलायला मागत नाही. हे तिघेजण अजूनही बॉलीवूडवर राज्य करतात त्याबद्दल दुमत नाही. मात्र जेव्हा भारत आणि विदेशांमधील धार्मिक बाबीं, त्यातील भेदभाव यावर व्यक्त होण्याची वेळ येते तेव्हा ते मागे सरकतात. असे दिसून आले. या शब्दांत नसरुद्दीन शहा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

काही ट्रोलर्सनं शाहरुखवर खालच्या पातळीवरचे आरोप केले आहेत. त्यात त्यांनी तो भारताचं खातो आणि पाकिस्तानचे गुणगान गातो. असेही म्हटले आहे. नसीरुद्दीन शहा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, भारतातील मुस्लिम हा पूर्णपणे वेगळा आहे. हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. सध्या सगळ्या जगाला अफगाणिस्तानविषयी सहानुभूती आहे. मात्र काही भारतीय मुस्लिम हे त्या तालिबान्यांचे समर्थन करताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT