Bollywood: 'Kuttey' Trailer Release Google
मनोरंजन

'KUTTEY' Trailer: नावाप्रमाणेच 'कुत्ते' चा ट्रेलर, नुसत्याच शिव्या! ऐकून कानावर ठेवाल हात..

अर्जुन कपूर, तब्बू आणि नसीरुद्दीन शाह अभिनित कुत्ते सिनेमाची घोषणा झाल्यापासून चर्चेत होताच...आता ट्रेलर पाहून शॉक बसलाय लोकांना.

प्रणाली मोरे

'KUTTEY' Trailer: अर्जुन कपूर, तब्बू आणि नसीरुद्दीन शाह अभिनित आगामी चित्रपट 'कुत्ते'ची घोषणा झाल्यापासूनच याची चर्चा सर्वत्र रंगली होती. प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढत असतानाच अलीकडेच, निर्मात्यांनी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले. अशातच, चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रतीक्षा करत असताना आता निर्मात्यांनी या चित्रपटाचा मनोरंजक आणि इंटेन्स ट्रेलर प्रदर्शित केला आहे. तसेच, डार्क ह्युमरने भरपूर असलेल्या या ट्रेलरमध्ये सात ग्रे-शेडेड पात्रांना पाहायला मिळेल. (Bollywood: 'Kuttey' Trailer Release)

एका स्टार-स्टडेड कार्यक्रमात 'कुत्ते'या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. तसेच, या कार्यक्रमात दिग्दर्शक आसमान भारद्वाज, त्यांचे वडील विशाल भारद्वाज, चित्रपटाचे कलाकार अर्जुन कपूर, तब्बू, नसीरुद्दीन शाह, कोंकणा सेन शर्मा, कुमुद मिश्रा, राधिका मदन आणि शार्दुल भारद्वाजसह कुमार, लव रंजन, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज हे उपस्थित होते.

लव फिल्म्स आणि विशाल भारद्वाज फिल्म्सच्या बॅनरखाली लव रंजन, विशाल भारद्वाज, अंकुर गर्ग आणि रेखा भारद्वाज निर्मित, 'कुत्ते'हा चित्रपट गुलशन कुमार आणि भूषण कुमार यांच्या टी-सीरीजद्वारा प्रस्तुत आहे. तसेच, या चित्रपटाला संगीत विशाल भारद्वाज यांनी दिले असून गुलजार यांनी गीते लिहिली आहेत. 'कुत्ते'हा चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT