Ved Teaser Riteish Deshmukh Genelia Deshmukh Esakal
मनोरंजन

Ved Teaser: ‘दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल....मनात थोडी आतुरता..थोडी भीती’ ‘वेड’ लावयला येतोय रितेश…

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही महिन्यांपासून ज्या मराठी चित्रपटाची चर्चा सुरू आहे, त्या 'वेड' चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांच्या प्रेमाचं वेड आता प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. प्रेम आणि वेड दोन भावनांचा खेळ या चित्रपटात दिसणार आहे. रितेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'वेड'चा टीझर शेअर केला आहे.

हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे दिवाळीच्या मुहूर्तावर रितेश देशमुखने त्याच्या 'वेड' चित्रपटाविषयी माहिती दिली होती. त्याच बरोबर त्यांने चित्रपटाचा फर्स्ट लुकही शेअर करत काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

या चित्रपटाची कथा अपूर्ण प्रेमाभोवती फिरते. या चित्रपटाच्या टीझरमध्ये रितेश देशमुख सांगत आहे की, ‘प्रेम असं समुद्रासारखं. कोणाच्या नशिबी लाठ, तर कोणाच्या नशिबी काठ. या संवादानं या टिझरची सुरुवात होतेय. तर 'काही वेड्यासारखे प्रेम करतात, तर काही प्रेमातलं वेड होतात' या चित्रपटाच्या टीझरमध्ये रितेश देशमुख सांगत आहे की,  ‘प्रेम मिळते तेव्हा आनंद मिळतो, पण प्रेम अपूर्ण राहिल्यावर विरह मिळतो’ तसच या टिझरमध्ये वेड तुझा विरह वणवा... हे गाण ही ऐकायला मिळतंय. फक्त काही ओळी ऐकूणच हे गाणं थेट ह्रदयाला भिडत आहे.

टीझर शेअर करत रितेशने कॅप्शन दिलयं “एका नव्या प्रवासाची सुरवात करतो आहे.माझं दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल....मनात थोडी आतुरता ..थोडी भीती …पण प्रचंड वेड....आशा आहे आपल्याला आवडेल…आशिर्वाद आणि प्रेम असू द्या.” रिलीज झाल्यानंतर चाहते खूप उत्सुक आहेत. चित्रपटात जेनेलिया डिसूजा एका साध्या लूकमध्ये दिसत आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा 10 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत तर या चित्रपटाद्वारे या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया डिसूझा मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirdi : साई बाबांच्या नगरीत हे काय सुरुय? संस्थानच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत मोठी खळबळ, धक्कादायक कारण समोर, पाहा VIDEO

Suryakumar Yadav: '... तर मला भारताच्या वनडे संघाचंही कर्णधारपद मिळालं असतं', सूर्यकुमार नेमकं काय म्हणाला? वाचा

Latest Marathi News Live Update : धनत्रयोदशीनिमित्त सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी धुळेकरांची लगबग

दिवाळी गिफ्ट काय द्यावं हेसुद्धा कळेना! पंढरपूर विठ्ठल मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिला चिकन मसाला, BVG कंपनीचा अजब कारभार

Pune - Nashik हायवेवर 'ट्राफिक जाम'ची दिवाळी! प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT