Gautami Patil megha ghadge 
मनोरंजन

Gautami Patil: पायाखालून कमरेपर्यंत येईल तेवढी साडी... गौतमीवर लावणीसम्राज्ञी मेघा घाडगे भडकल्या...

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून गौतमी पाटील ही चांगलीच व्हायरल झाली आहे. गौतमी पाटील आणि तिच्या लावणीचीच चर्चा आहे. तिचा सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग इथल्या लावणीचा कार्यक्रम चांगलाच गाजला, धक्कादायक म्हणजे लावणी कार्यक्रम होता त्याच परिसरात एक मृतदेह आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती.

केवळ यामुळेच गौतमी चर्चेत आली नाही तर याआधीही गौतमी लावणी सादर करताना अंगावर पाणी ओतून घेतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळीही तिच्या एका वादग्रस्त इशाऱ्यामुळं तिला अनेकांच्या टीकांना सामोरे जावे लागले होते. सार्वजनिक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळी गाण्यावर विचित्र हावभाव करून, अंगावर पाणी ओतून नाचताना दिसत होती. यावर सर्व क्षेत्रातून तिखट शब्दात प्रतिक्रियी आल्या होत्या. मेघा घाडगे यांनीही गौतमीची भेट घेऊन तिची कानउघाडणी केली होती. त्यानंतर गौतमीने सर्वांची माफी देखील मागीतली होती.

मात्र सांगलीत झालेल्या प्रकारानंतर लावणीसम्राज्ञी आणि बिग बॉस फेम लावणी कलाकार अभिनेत्री मेघा घाडगे यांनी गौतमीची चांगलीच कानउघाडणी केली आहे. आम्ही जे करतो ती लावणी नसून गौतमी करते ते अश्लील चाळे म्हणजेच खरी लावणी असल्याची सडकून टिका त्यांनी गौतमीवर केली आहे.

हेही वाचा- भारतीय महिलांचा सुरक्षित गुंतवणुकीकडेच का असतो ओढा?

यासंदर्भात त्यांची फेसबूक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. त्यात त्या म्हणतात, ‘खूप खूप धन्यवाद गौतमी पाटील. आज तुला लावणी क्वीन हा ‘किताब मिळाला. माफ कर खूप चूक झाली. खरंतर अशी लावणी असते हे आमच्या पूर्वज्यांना ही माहित न्हवत. का आम्हाला असं चुकीचं शिकवलं गेलं. का या शाहिरानीं कवन लिहिली??? पुस्तकातून चुकीचा लोककलेचा अभ्यास शिकवला. कृपाकारून बंद करा हे सगळं . विनाकारण लोककलवांतांनी पिढ्यान पिढ्या कलेच्या नावाखाली पुरस्कार घेत गेले आत्ता माझे डोळे उघडले. मीही या पुढे साडीचा पदर अंगावर घेणार नाही. पायाखालून कमरेपर्यंत येईल तेवढी साडी, परकर वर करेन आणि पाण्याची बाटली घेऊन अंगावर ओली चिंब होईपर्यंत ओतेन. पायात घुंगरू घालू की नको ..? लक्षात नाही तू घातले होतेस का?

इतकच नाही तर त्यानी पुढे लिहिलंय, ‘काल तर प्रेक्षकांना मधनं गर्दीत एकाचा खून झाला. खूप वाईट वाटलं ऐकून . पण तुझी ती भन्नाट अश्लील अदाकरी बघायला कोणाला नाही आवडणार. अभी तो पिचर बाकी हैं…!! आम्ही आपले बसलोय अदाकारीची शिबीर करत, प्लीझ मला हे सगळं शिकावं अल्बम मध्ये केलंय थोडंसं (कटा कीरर्रर्र ) ते ही आयटम साँग म्हणून. पण स्टेज वर नाही केल कधी. मला तुझी शिष्य बनवशिल का??कारण आम्हाला ही जगायच आहे . कलेनी पोट भरत नाही हे कळून चुकलंय, घुंगरू, शालू.. विकणे आहे .. प्लीझ मेसेज करा. पोटासाठी नाचते मीं परवा कोणाची … लव्ह यू गौतमी’, अशी पोस्ट मेघा घाडगेने लिहिली आहे.

यानंतर त्यांनी फेसबूक लाइव्ह घेत तिची बाजू घेणाऱ्यांचीही आणि गौतमीचाही चांगलाच समाचार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

kapil sharma : कपिल शर्माच्या कॅनाडातील कॅफेवर पुन्हा गोळीबार....लॉरेंस बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी...पुढचा हल्ला मुंबईत करण्याचीही धमकी

Narali Pournima and Gauri Visarjan Holiday : राज्य सरकारने नारळीपौर्णिमा अन् ज्येष्ठगौरी विसर्जनानिमित्त स्थानिक सुट्टी केली जाहीर, मात्र...

Sanju Samson ने राजस्थानची साथ सोडल्यास कॅप्टन कोण?

China criticized USA : भारतावर 'टॅरिफ बॉम्ब' फोडणाऱ्या अमेरिकेला आता चीननेही सुनावलं!

Latest Maharashtra News Updates: मनोज जरांगे पाटील यांची दिली नांदणी मठाला भेट

SCROLL FOR NEXT