Selfiee Trailer Esakal
मनोरंजन

Selfiee Trailer: गोष्ट फक्त एका 'सेल्फी'ची! सुपरस्टार अन् सुपरफॅन मधला राडा..

अभिनेता अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी यांच्या 'सेल्फी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे

Vaishali Patil

सुपरस्टार अक्षय कुमार आणि इमरान हाश्मी त्यांच्या आगामी 'सेल्फी' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलिज झाल्यानंतर चाहत्यांना या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रतिक्षा होती. दरम्यान आज 22 जानेवारीला निर्मात्यांसाठी 'सेल्फी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

या चित्रपटात अक्षय कुमार विजय नावाच्या अभिनेत्याच्या भूमिकेत आहे तर इमरान पोलिस ऑफिसर आहे. ट्रेलरच्या सुरुवातीलाच खीलाडी कुमार आगीतून बाहेर पडताना दिसत आहे आणि 'जंगल मेरा मुझे कहते हैं शेर' असा डायलॉग म्हणतो.

'सेल्फी' चित्रपटाच्या या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दाखवण्यात आले आहे की, या चित्रपटात एका चित्रपटातील अभिनेता आणि त्याच्या चाहत्याची गोष्ट आहे.

यात अभिनेत्याला ड्रायव्हिंग लायसन्स काढायचे असते तर आरटीओ ऑफिसरला त्याच्यासोबत सेल्फी. 'सुपरस्टार विजयला परवाना हवा असेल तर त्याला इथे येऊन सर्वसामान्यांप्रमाणे सर्व टेस्ट द्याव्या लागतील.' असं आरटीओ ऑफिसर(इमरान) म्हणतो. पुढे काय होते ते ट्रेलरमध्ये पाहणे मनोरंजक असेल.

या ट्रेलरवरून असा अंदाज लावता येतो की, अक्की आणि इमरान यांचा हा चित्रपट फुल ऑन मसाला चित्रपट आहे, ज्यामध्ये कॉमेडी, थ्रिलर आणि अॅक्शन एकत्र दिसणार आहेत. पृथ्वीराज प्रॉडक्शन, धर्मा प्रोडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स निर्मिती 'सेल्फी' 24 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्की आणि इम्रान व्यतिरिक्त प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा आणि डायना पेंटी देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT