dasvi movie teaser  esakal
मनोरंजन

Dasvi Teaser Viral: 'मी जेलमधून दहावीची परीक्षा देतोय!'

बॉलीवूडचा स्टार अभिनेता अभिषेक बच्चनचा नवा चित्रपट (bollywood actor abhishek bachchan) हा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

युगंधर ताजणे

Entertainment News: बॉलीवूडचा स्टार अभिनेता अभिषेक बच्चनचा नवा चित्रपट (bollywood actor abhishek bachchan) हा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (bollywood news) त्या चित्रपटाचं नावचं मुळी गंमतीशीर आहे. दसवी (Dasvi Teaser) हे त्या चित्रपटाचे नाव असून त्याचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा चित्रपट अभिषेकच्या चाहत्यांसाठी वेगळी पर्वणी असणार आहे. अभिषेकनं या चित्रपटामध्ये गंगा राम चौधरीची भूमिका साकारली आहे. त्याच्या टीझरला नेटकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला असून त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टरमध्ये अभिषेक जेलमधील एका टेबलावर उभा राहिल्याचे दिसत आहे. त्याचा अंदाज हा काही एखाद्या नेत्यापेक्षा कमी नाही. त्यानं आपले दोन्ही हात पुढे करुन लोकांना शिक्षणासाठी आवाहन केले आहे. चित्रपटाच्या टीझरनं आता वेगवेगळे प्रश्न प्रेक्षकांपुढे उपस्थित केले आहेत. जसं की, गंगा राम चौधरी कोण आहेत, आणि तो दहावीच्या परिक्षेची तयारी का करत आहे, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं ही चाहत्यांना हा चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहे. त्या फोटोला कॅप्शन देताना अभिषेकनं लिहिलं आहे की, एका विद्यार्थ्यांकडून दुसऱ्या विद्यार्थ्याकडे. दहावीच्या परिक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा.

अभिषेक बच्चनच्या दसवी नावाच्या चित्रपटामध्ये एका अशिक्षित नेत्याची कहाणी आहे. आता व्हायरल झालेल्या टीझरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्या जेलमध्ये नेत्याला कशाप्रकारे शिस्तीचे धड़े मिळाले हे प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. यात एक महत्वाची गोष्ट अशी की, जेलमध्ये तो नेता दहावी पूर्ण करतो. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार जलोटानं केलं आहे. चित्रपटामध्ये अभिषेक बच्चन शिवाय यामी गौतम, निम्रत कौर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. अभिषेकचा हा चित्रपट 7 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT