Pathaan
Pathaan  esakal
मनोरंजन

Bollywood Movies : पाकिस्तानात नाही पण बांग्लादेशात होतात खान कलाकारांचे चित्रपट, कारण...

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Movies Released in Bangladesh Salman : बॉलीवूडमध्ये किंग खान शाहरुख, भाईजान सलमान खान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते त्या कलाकारांची वेगळी ओळख आहे. केवळ भारतच नाही तर जगाच्या पाठीवर या कलाकारांच्या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्ग मोठा आहे.

बॉलीवूडच्या चित्रपटांना पाकिस्तानात बंदी आहे. हे अनेकांना ठाऊक आहे. मात्र तरीही बेकायदेशीररित्या बॉलीवूडचे चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित होताना दिसतात. शाहरुखचा पठाण तर पाकिस्तानमधील एका थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. एका उद्योगपतीनं त्याच्या पार्टीमध्ये पठाणचे स्क्रिनिंग केले होते. त्यानंतर त्या उद्योगपतीवर टीका करण्यात आली होती.

Also read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

आता बॉलीवूडचे तीन खान अभिनेत्यांच्या चित्रपटांविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांचे चित्रपट बांग्लादेशमध्ये प्रदर्शित होत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एकीकडे भारतामध्ये काही चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याची तक्रार काही निर्माते आणि दिग्दर्शक करत असल्याचे दिसून आले आहे. अशातच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या बातमीनं आता नेटकऱ्यांच्या टोकदार प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

जानेवारीमध्ये शाहरुखचा पठाण प्रदर्शित होता. आता तो बांग्लादेशमध्ये प्रदर्शित होणार आहे. १२ मे रोजी तो प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी देखील बांग्लादेशमध्ये बॉलीवूडचे काही चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. आमिर खानचा थ्री इडियस, तर शाहरुखचा माय नेम इज खान नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. सलमान, शाहरुखच्या चित्रपटांना त्या देशांमध्ये मिळणारा प्रतिसाद आणि आर्थिक गणित यामुळे हे चित्रपट प्रदर्शित होत असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT