Raveena Tandon: ओटीटीवर अभिनेत्रींना मिळणाऱ्या मानधनाविषयी रवीनाचा मोठा खुलासा, म्हणाली,'इथे महिलांना..'

'मन की बात' च्या १०० व्या एपिसोड निमित्तानं आयोजित कार्यक्रमात नारी शक्ती सेशन दरम्यान रवीनानं आपले मुद्दे प्रखरपणे मांडले आणि खळबळ उडवून दिली.
Raveena Tandon
Raveena TandonInstagram

Raveena Tandon: बॉलीवूड इंडस्ट्रीत हिरो-हिरोईन यांना मानधन देताना केल्या जाणाऱ्या भेदभावावरनं अनेक अभिनेत्रींनी आपलं दुःख याआधी अनेकदा व्यक्त करुन झालं आहे. दीपिका पदूकोणनं तर आपला आवाज बुलंद केला होता. पण अभिनेत्री रवीना टंडनचं मात्र यावरचं मत एकदम वेगळंच आहे.

नुकतंच अभिनेत्रीनं म्हटलं आहे की भले सिनेमात अभिनेत्री अभिनेत्यांपेक्षा कमी पैसे कमवत असतील पण ओटीटी आणि टी.व्ही इंडस्ट्रीत मात्र महिलांचाच बोलबाला आहे,त्यांना अभिनेत्यांच्या तुलनेत जास्त पैसे मिळत आहेत. (Raveena Tandon on Pay parity, statement viral )

Raveena Tandon
Bhau Kadam च्या लेकीची चिंतेत टाकणारी पोस्ट व्हायरल, स्वतःला झालेल्या आजाराची माहिती देत म्हणाली..

रवीना टंडननं 'मन की बात' या कार्यक्रमाच्या १०० व्या एपिसोड निमित्तानं बोलताना या गोष्टीवर प्रकाशझोत टाकला आहे. यादरम्यान अभिनेत्री म्हणाली की, ''फिल्म इंडस्ट्रीला ओटीटी आणि टी.व्ही इंडस्ट्रीकडून ही गोष्ट शिकायची गरज आहे,जिथे ते स्त्री केंद्रीत सिनेमे बनवत आहेत आणि महिलांना जास्त पैसे देत आहेत''.

''आज टी.व्ही इंडस्ट्रीत महिलांना पुरुषांच्या तुलनेत जास्त पैसे मिळत आहेत. टी.व्ही इंडस्ट्रीत महिलांनी आपलं वर्चस्व दाखवलं आहे आणि ओटीटीवर देखील महिलांचा दबदबा आहे''.

'मन की बात' च्या १०० व्या एपिसोड निमित्तानं आयोजित कार्यक्रमात नारी शक्ती सेशन दरम्यान रवीनानं आपले मुद्दे प्रखरपणे मांडले.

रवीनानं यामागचं कारण सांगताना स्पष्ट केलं की फिल्म इंडस्ट्रीत निर्माते आणि दिग्दर्शक हे जास्त पुरुषच आहेत. तर टी.व्ही आणि ओटीटीवर महिला देखील निर्मिती-दिग्दर्शनात मोठ्या संख्येने आहेत. या कारणानं महिला कलाकारांना मुख्य भूमिका मिळत आहेत.आणि त्यांचे मानधन पुरुष कलाकारांपेक्षा जास्त आहे.

Raveena Tandon
Aishwarya Narkar:'ओल्या सांजवेळी..उन्हे सावलीस बिलगावी..तशी तू..'
Raveena Tandon
Prarthana Behere: 'तुझ्या ट्रोलर्सवर हसतेयस का?'

रवीना टंडनच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर ती 'केजीएफ चॅप्टर २' मध्ये दिसली होती. याव्यतिरिक्त 'आरण्यक' नावाच्या वेबसीरिजमधून तिनं ओटीटीवर पदार्पण केलं आहे. यामधील तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली. रविनानं 'नच बलिये' च्या ९ व्या सीझनसाठी परिक्षकाची भूमिका देखील पार पाडली होती. सध्या रविना 'घुडचढी' सिनेमात काम करतेय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com