actress kangana ranaut
actress kangana ranaut  Team esakal
मनोरंजन

"आपलं पहिलं राष्ट्रगीत" असं म्हणत कंगनानं शेअर केला व्हिडिओ!

सकाळ डिजिटल टीम

kangana ranaut : बॉलीवूडची (Bollywood Actress) वादग्रस्त अभिनेत्री म्हणून कंगनाचे (kangana ranaut) नाव घ्यावं लागेल. कंगना रनौतनं आतापर्यत आपल्या वेगवेगळ्या विधानांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिनं काही महिन्यांपूर्वी देशाच्या स्वातंत्र्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यामुळे तिच्यावर देशभरातून मोठ्या प्रमाणात टीका झाली होती (Troll On social media) . वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर गुन्हेही दाखल झाले होते. आता कंगनानं देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाचं वेगळचं राष्ट्रगीत व्हायरल केलं आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. तिच्यावर टीका होताना दिसत आहे. Bollywood Panga Girl kangana Ranaut share national first anthem song

बॉलीवूडमध्ये पंगा गर्ल म्हणून अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut Trolled) नावाचा उल्लेख करावा लागेल. वादग्रस्त वक्तव्यं करुन चर्चेत राहणे यामुळे कंगना प्रसिद्धीस आली आहे. चित्रपटांमुळे नव्हे तर चर्चेतून ती सगळ्यांच्या टीकेचा विषय झाली आहे. आता तिनं प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस अगोदर सोशल मीडियावरुन अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कंगनानं जो व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये तिनं ते गाणं आपल्या देशाचे पहिले राष्ट्रगीत असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे तिच्या त्या व्हिडिओवर टीका होताना दिसून आले आहे.

कंगनानं इंस्टावरुन एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये तिनं 3 मिनिटे 16 सेकंदाचे एक गाणं व्हायरल केले आहे. त्याची सुरुवात लाल रंगाच्या झेंड्यापासून होते. त्यानंतर वेगवेगळ्या व्हिज्युएलच्या साह्यानं ते गाणं सुरु होतं. त्या गाण्याला कंगणानं एक कॅप्शनही दिली आहे. ते पाहून आणि वाचून अनेकांना धक्का बसला आहे. त्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कंगनानं लिहिलं आहे की, आपल्या देशाचे पहिले राष्ट्रगीत. देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा. कंगनाच्या त्या पोस्टला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sudhakar Badgujar: ठाकरेंचे खंदेसमर्थक बडगुजरांना तडीपारीची नोटीस; ऐन निवडणुकीच्या काळात शहर पोलिसांची कारवाई

Rohit Vemula: "आरोपींना शिक्षा होणारच!" रोहित वेमुला मृत्यूप्रकरणी CM रेवंथ रेड्डींचा इशारा

Tu Bhetashi Navyane: मालिकाविश्वात पहिल्यांदाच AI चा वापर; ‘तू भेटशी नव्याने’च्या प्रोमोनं वेधलं लक्ष

Google Wallet Launch : 'गुगल पे' अन् 'गुगल वॉलेट' एकसारखं नाही! दोन्हीमध्ये काय आहे फरक?

Latest Marathi News Live Update : आंबेगाव, जांभूळवाडी- कोळेवाडी परिसरात रिमझिम पावसाला सुरुवात

SCROLL FOR NEXT