Pathaan Besharam Rang esakal
मनोरंजन

Besharam Rang: पाकड्यांनाही गप्प रहावेना! दीपिकाच्या 'बेशरम रंग' गाण्याची पाकिस्तानात चर्चा

सकाळ डिजिटल टीम

पठाण चित्रपटावरुन रंगलेला वाद काही शांत होण्याचं नावं घेत नाही. त्यातच शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणं या वादामागंच मोठं कारण ठरलं.

गाण्यातील दीपिकाच्या बिकिनीच्या भगव्या रंगावर काही लोक नाराजी व्यक्त करत आहेत. यामूळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला गेला. आणि त्याबरोबच 'पठाण' बॉयकॉटचा ट्रेन्डही सुरू झाला.

याशिवाय अनेक सोशल मीडिया यूजर्सनी ' बेशरम रंग' या गाण्यावर धून चोरल्याचा आरोप केला आहे. आता या गाण्यावर पाकिस्तानी अभिनेता उस्मान खालिद भट्टने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उस्मान खालिद भट्ट यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट काही क्षणातच ही पोस्ट व्हायरल झाली आहे. ज्याची खूप चर्चा होत आहे. मात्र, गाण्यातील दीपिका पदुकोणच्या कपड्यांबाबत त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.तर उस्मान खालिद भट्टने ट्विट केले की, 'बेशरम रंग गाणे ऐकल्यानंतर मला वाटले की त्यांनी जगजीत सिंगच्या कोई फरियाद गाण्यासोबत हे काय केल' ...

उस्मानच्या या ट्विटवरून त्याला 'बेशरम रंग' हे गाणे आवडले नसल्याची अटकळ बांधली जात आहे. या गाण्याला तो तुम बिन चित्रपटातील 'कोई फरियाद' गाण्याची कॉपी म्हणत आहे. याआधीही सोशल मीडियावर युजर्सनी 'बेशरम रंग'ची धून जैन यांच्या 'मेकेबा' गाण्याची कॉपी असल्याचे सांगितलं आहे. दोन्ही गाण्यांची बीट सारखीच असल्याचं लोक सांगतात. अशाप्रकारे आता 'बेशरम रंग'च्या संगीतकारांवरही लोकांनी धून चोरल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

SCROLL FOR NEXT