galvan vally 
मनोरंजन

गलवान वॅलीमध्ये शहीद झालेल्या जवानांना बॉलीवूडकरांनी वाहिली श्रद्धांजली

सकाळवृत्तसेवा

मुंबई- भारत आणि चीनच्या नात्यात सुरु असलेल्या तणावामध्ये मंगळवारी गलवान वॅलीमध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये झालेल्या झटापटीत २० भारतीय जवान शहीद झाले.  शहीद जवानांचं देशासोबतंच सिने इंडस्ट्रीतील अनेक कलाकार त्यांच्या या देशसेवेच्या कार्यासाठी त्यांचं अभिवादन करत आहेत. 

महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मिडियाच्या माध्यमांतून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी ट्वीट करुन लिहिलंय, 'जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी. त्यांनी देश आणि आपल्या सुरक्षिततेसाठी त्यांच्या जीवाची बाजी लावली आहे.' 

याशिवाय अक्षय कुमारने गलवान वॅलीमध्ये चीनसोबत झालेल्या झटापटीत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली दिली आहे. अक्षय कुमारने ट्वीट करत लिहिलंय, 'गलवान वॅलीमध्ये शहीद झालेल्या आपल्या शूर जवानांनाच्या शहीदाची बातमी ऐकून मी खूप दुःखी आहे. देशासाठी त्यांची केलेल्या अमूल्य सेवेसाठी आम्ही नेहमीच तुमचे ऋणी राहू. शहीदांच्या कुटुंबाप्रती मी संवेदना व्यक्त करतो.'

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने लिहिलंय, '२०२० हे वर्ष आपल्यासाठी केवळ नुकसानाचा एक पर्याय बनला आहे. आपल्या देशाचे शूर जवान गलवान वॅलीमध्ये शहीद झाले. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. देश तुमच्या त्यागाचा नेहमी ऋणी राहील.'

वरुण धवन आणि यामी गौतमीनेही श्रद्धांजली वाहिली आहे, यामीने ट्वीटकरुन लिहिलंय, 'आमच्या शूर जवानांच्या कुटुंबासोबत आमच्या संवेदना आहेत. देशाच्या सुरक्षेसाठी दिल्या शहीद झालेल्या जवानांचे आम्ही सदैव ऋणी राहू. मी शांततेसाठी प्रार्थना करते.'

तर वरुण धवनने म्हटलंय, 'जवानांच्या शहीदाच्या बातमीने मला खूप दुःख झाले आहे. आम्ही नेहमीच त्यांच्या या त्यागाचे ऋणी राहू.'   

bollywood pays tribute to galwan valley martyrs amitabh bachchan akshay kumar  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरातला भेटलेल्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर...; विजय वडेट्टीवारांचा इशारा

Dhurandhar 2: ‘धुरंधर 2’मध्ये जसकीरतच्या बहिणीची चर्चा! तिच्या सौंदर्य पाहून अलिनाही वाटेल फिकी

Jalgaon Cotton Production : जळगावचा कापूस हंगाम संपुष्टात! 'सीसीआय'ची खरेदी बंद, निम्म्यावरच अडकले कापूस गाठींचे उत्पादन

Manchar Accident : मंचरजवळ एकलहरे येथे भीषण अपघात! पिंपरी-चिंचवडचे वास्तुविशारद आंबेगावे पती-पत्नी व सासूचा मृत्यू, दोन मुले गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : पंजाब वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन (PWC) अधिकाऱ्याच्या आत्महत्येचे प्रकरण

SCROLL FOR NEXT