Rasha Tandon Ajay Devgn Aaman Devgan Esakal
मनोरंजन

Rasha Tandon: अजय देवगणचा पुतण्या हिरो तर रवीना टंडनची मुलगी हिरोईन! स्टार किड्स पदार्पणासाठी सज्ज

Vaishali Patil

नव्वदचं दशक गाजवणारी रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रीपैकीं एक आहे. तिच्या चित्रपट अभिनयाचे अजूनही चाहते घायाळ आहे. सध्या मनोरंजन रविना जास्त सक्रिय नसली तरी तिच्या भुमिकेने ती चाहत्याचं लक्ष आकर्षित करते. मात्र आता रविनाची मुलीनेही बॉलिवूडमध्ये येण्यासाठी कंबर कसली आहे.

दिग्दर्शक अभिषेक कपूरचा आगामी अॅक्शन अॅडव्हेंचर चित्रपटतून रवीना टंडनची मुलगी राशा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इतकच नाही तर अजय देवगणचा पुतण्या अमन देवगणचीही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री होत आहे. त्यासोबतच अजय देवगणही या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात राशा ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

'चंदीगढ करे आशिकी' नंतर चित्रपट निर्माता अभिषेक कपूरने रवीना टंडनची मुलगी राशाला आपल्या नवीन चित्रपटासाठी साइन केले असल्याचा दावा करण्यात येत आहे. चित्रपटाचं शूटिंग या वर्षीच्या उन्हाळ्यात सुरू होणार असल्याचही सांगण्यात येत आहे.

चित्रपटाच्या कथेबद्दल अजून काही माहिती आली नसली तरी या चित्रपटातून अभिषेक बॉलीवूडचे दोन मोठे स्टार किड्स राशा टंडन आणि अमन देवगणला लाँच करणार असल्याचं बोलले जात आहे. आता सर्वांच्या नजरा बॉलीवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या राशावर आहेत. अमन देवगण आणि राशा यांची ही नवीन आणि सुंदर जोडी या वर्षातील मोस्ट अवेटेड लॉन्चिंग म्हणून बोलली जात आहे.

अभिषेक कपूरचे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान कौतुकास्पद आहे. त्याने सुशांत सिंग राजपूत, फरहान अख्तर, राजकुमार राव, सारा अली खान आणि इतर अनेकांच टॅलेंन्ट ओळखलं आणि त्यांना लॉन्च केले. अशा परिस्थितीत आता रवीनाची लाडकी मुलगी राशा हिचे पदार्पण जोरदार होणार असल्याची चर्चा चाहत्यांना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT