Bollywood: Renuka Shahane faced rejection after audition Instagram
मनोरंजन

Bollywood चा एक काळ गाजवला; पण आज रेणुका शहाणेंना रीजेक्ट करतायत दिग्दर्शक, कारण सांगत म्हणाल्या...

विकी कौशलच्या 'गोविंदा नाम मेरा' सिनेमाच्या माध्यमातून अनेक वर्षांनी रेणुका शहाणे बॉलीवूडमध्ये कमबॅक करतायत.

प्रणाली मोरे

Renuka Shahane: बॉलीवूडचा 'हम आपके है कौन' सारखा सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर रेणुका शहाणे रातोरात स्टार झाल्या हे आता काही नव्यानं सांगायची गरज नाही. मोठ्या पडद्यावर नेहमीच त्यांनी आपल्या अभिनयाच्या जादूनं चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं. १६ डिसेंबरला डिस्ने हॉट स्टारवर त्यांनी अभिनय केलेला 'गोविंदा नाम मेरा' हा कॉमेडी सिनेमा रिलीज झाला आहे. (Bollywood: Renuka Shahane faced rejection after audition)

या सिनेमातील रेणुका शहाणे यांची भूमिका नेहमीपेक्षा एकदम वेगळी आहे. २ तासाच्या या सिनेमात त्यांनी आपल्या अभिनयाच्या अनेक छटा प्रेक्षकांना दाखविल्या आहेत. मोठ्या ब्रेकनंतर पडद्यावर कमबॅक करणाऱ्या रेणुका शहाणे यांनी या दरम्यान रीजेक्शनचा सामना केला. याचा खुलासा स्वतः रेणुका शहाणे यांनी केला आहे. आणि इतक्या वर्षाने असं का घडतंय यावर देखील अभिनेत्रीनं भाष्य केलं आहे.

'गोविंदा नाम मेरा' या सिनेमात रेणुका शहाणे यांनी विकी कौशल,कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकरसोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यांच्या कामाची खूप प्रशंसा देखील होत आहे. आता एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बरेच खुलासे केले आहेत. त्यांनी आपल्या वाट्याला येणाऱ्या रीजेक्शनवर भाष्य केलं आहे. ऑडिशन झाल्यानंतर आपल्याला अनेकदा रीजेक्ट केल्याचं त्या म्हणाल्या.

रेणुका शहाणे यांचे म्हणणे आहे की,ऑडिशननंतर रीजेक्ट होणं या गोष्टी अनेकदा माझ्यासोबत गेल्या काही काळात घडल्या. मी दिग्दर्शकाच्या माध्यमातून माझ्या भूमिकेला समजून घेणं गरजेचं आहे असं समजते पण आजकाल कास्टिंग डायरेक्टर्सचे असिस्टंट या ऑडिशन घेतात. आणि मला त्यांची काम करण्याची पद्धत कळतच नाही.आणि मग माझ्या वाट्याला रीजेक्शन येतं.

रेणुका शहाणे पुढे म्हणाल्या,'' या ऑडिशन्समध्ये मी माझे १०० टक्के देत नाही, पण मी रीजेक्शनला गंभीरतेने देखील घेत नाही. मला नाही वाटत की मी चांगली अभिनेत्री नाही. कारण मी एक दिग्दर्शिका देखील आहे. मला माझ्या एखाद्या भूमिकेसाठी अनेकदा इतर कलाकार पसंत येतात,पण याचा अर्थ असा नाही की रीजेक्शन वाट्याला आलेल्या कलाकारांना अभिनय येत नाही. 'गोविंदा मेरा नाम' साठी मला समोरून कॉल आला होता. त्यांना वाटत होतं की विक्कीच्या आईची भूमिका मी करावी''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT