Kantara Movie esakal
मनोरंजन

Kantara: आरआरआर नंतर 'कांतारा'ही ऑस्करच्या लढाईत ....

सकाळ डिजिटल टीम

यंदा मनोरंजन विश्वावर दाक्षिणात्य चित्रपटांचा डक्का होता. मग तो पुप्षा असो किंवा आरआरआर, केजीएफ याचित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असली तरी ऋषभ शेट्टीच्या 'कंतारा' या चित्रपटही मागे नाही. या चित्रपटानेही जगभरात खळबळ उडवून दिली आहे. अविश्वसनीय यश मिळल्यानंतर कांतारा जगभरात प्रदर्शित झाला आहे.

जगभरात या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली आहे. आता 'कंतारा'ला ऑस्कर 2023 मध्ये पाठवण्याची तयारी सुरू आहे. चित्रपटाच्या ऑस्कर नामांकनासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. होंबळे प्रॉडक्शनचे संस्थापक विजय किरगंदूर यांनी एका मीडिया हाऊसशी बोलताना याबाबत माहिती दिली.

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

एका मीडिया हाऊसशी संवाद साधताना विजय किरगंडूर म्हणाले, 'आम्ही कांतारा चित्रपट ऑस्करसाठी  पाठण्याचा अर्ज सादर केला आहे. अजून अंतिम नामांकन येणे बाकी असल्याने आम्ही उत्सुक आहोत. कांतारा ही कथा लोकांची आहे. ती जगभरात पोहोचेल अशी आशा आहे.'

'कंतारा' हा चित्रपट याआधी फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता, परंतु चित्रपटाची लोकप्रियता पाहता, तो तेलगू, हिंदी, तमिळ आणि मल्याळम सारख्या भाषांमध्ये डब करून रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट केवळ 16 कोटींच्या बजेटमध्ये बनला असून, या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 400 कोटींहून अधिक कमाई केली आहे. थिएटरनंतर OTT प्लॅटफॉर्म Netflix वरही 'कंतारा' हिंदीमध्ये स्ट्रीम करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT