Ananya Pandey Aditya Roy Kapoor affair Esakal
मनोरंजन

Ananya-Aditya: नक्कीच काहीतरी शिजतंय! चंकी पांडेची लाडकी लेक अनन्या अन् आदित्य पुन्हा एकत्र चमकले

Vaishali Patil

बॉलीवूडमध्ये अनेक बॉलिवूड कुणी अभिनेते आणि अभिनेत्री सोबत दिसले तर त्याच्यात काहीतरी शिजतयं अशा चर्चा तर होतातच. काही दिवसांपुर्वीच तमन्ना आणि विजय देखील असेच एकत्र दिसले आणि पुन्हा त्याच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या. तसचं काहीस बॉलिवूडमधील सुपरहॉट अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या बाततीतदेखील बोलल जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या डेटिंगच्या अफवा बॉलिवूडच्या वर्तुळात फिरत आहे. दोघांची नावे अनेकवेळा एकमेकांशी जोडली गेली आहेत. दोघेही गुपचूप एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आहेत. करण जोहरने 'कॉफी विथ करण' शोमध्ये अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूरच्या अफेअरबद्दल हिंट दिली होती. त्यानंतर ते बऱ्याचवेळा एकत्र आले मात्र त्यांनी या नात्याला नाव दिले नाही. आता त्यातच पुन्हा एकदा हे कथित लव्हबर्ड एकत्र दिसले आहे.

पापाराझींनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, अनन्या कारच्या पुढच्या सीटवर बसलेली दिसते डिनर पार्टीला जाताना हसताना दिसत आहे. तर दुसरीकडे, आदित्य करणच्या पार्टीत पोहोचला. यावेळी दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान करत ट्यूनिंग केले आहे.

चित्रपट निर्माता करण जोहरच्या पार्टीत सहभागी झाले होते. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

खरंतर याआधीही हे दोन्ही स्टार एकत्र स्पॉट झाले आहेत. नुकतीच फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी पार्टी झाली. या पार्टीत दोघेही एकत्र दिसले होते, त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हे फोटो व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्या.

करण जोहरच्या डिनर पार्टीला आलिया भट्ट, रणबीर कपूर, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, रोहित धवन, अयान मुखर्जी आणि आरती शेट्टी यांनी हजेरी लावली होती.

अनन्या पांडेच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच विक्रमादित्य मोटवाने यांच्या अन् फरहान अख्तरच्या 'खो गए हम कहाँ' मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव सोबत दिसणार आहे. सध्या अनन्या आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल 2' च्या रिलीजच्या तयारीत आहे. तर आदित्य देखील नाईट मॅनेजन या वेबसिरिजनंतर काही उत्कृष्ट प्रोजेक्टच्या शोधात आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT