मनोरंजन

सलमान दुसऱ्यांदा शाहरुखच्या भेटीला, वडील सलीम खानही सोबत

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या भेटीला आता सलमानसह त्याचे वडिल प्रसिद्ध पटकथा लेखर सलीम खान गेले आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. सलमान आणि सलीम खान यांच्या गाड्यांचा ताफा मन्नतकडे जातानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेव्हा आर्यन खानला अटक झाली होती तेव्हा त्या रात्री सलमाननं शाहरुखची भेट घेतली होती. त्या भेटीचे फोटोही व्हायरल झाले होते. सलमाननं शाहरुखची घेतलेली भेट ही आर्यन खानच्या निमित्तानं होती. हे चाहत्यांना सांगण्याची गरज नव्हती. आता सलमान दुसऱ्यांदा शाहरुखच्या भेटीला गेला असून त्याच्या सोबत सलीम खानही आहेत. मात्र त्या भेटीमध्ये त्यांच्यात काय चर्चा झाली याची माहिती समोर आलेली नाही.

सध्या आर्यन खान हा न्यायालयीन कोठडीत आहे. उद्या त्याच्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. आतापर्यत दोन वेळा आर्यनचा जामीन फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्याला उद्या तरी जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या एका क्रुझवर रेव्ह पार्टी सुरु होती. त्या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या प्रवाशांनी ड्रग्ज बाळगल्याची माहिती एनसीबीला लागली. त्यानंतर त्यांनी केलेल्या कारवाईमध्ये शाहरुखच्या मुलाला आर्यन खानला अटक केली. बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला केलेली अटक त्यामुळे हे प्रकरण मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे.

आतापर्यत शाहरुखला बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी आपला पाठींबा जाहीर केला आहे. त्यामध्ये ऋतिक रोशन, सुनील शेट्टी, पूजा भट्ट, दिग्दर्शक हंसल मेहता, फराह खान, सुझैन खान, यांच्यासह अनेक अभिनेत्यांनी शाहरुखची बाजू घेतली आहे. या प्रकरणाला गेल्या दोन तीन दिवसांपासून वेगळे वळण लागले आहे. त्यामुळे त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही बदलल्याचे दिसून येते आहे. काल जम्मु काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी आर्यनला त्याच्या आडनावावरुन लक्ष्य केलं जात असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाद रंगल्याचेही दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT