Sarabhai VS sarabhai Fame satish shah response to racist comment on london heathrow airport Google
मनोरंजन

Bollywood: लंडन एअरपोर्टवर सतीश शाहसोबत वर्णद्वेष..अभिनेत्यानं एकाच वाक्यात केली फॉरेनर्सची बोलती बंद

लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर आपल्याला मिळालेल्या चुकीच्या वागणुकीसंदर्भात सतीश शहा यांनी ट्वीट करत सांगितलं आहे.

प्रणाली मोरे

Bollywood: 'हम आपके है कौन' सिनेमातील सलमानचे डॉक्टर अंकल म्हणून कधी आपण त्यांना मोठ्या पडद्यावर पाहिलं असेल तर कधी साराभाई मालिकेतील त्यांच्या विनोदावर खळखळून हसला असाल..असे सतिश शाह त्यांच्या अचूक कॉमेडी टायमिंगसाठी ओळखले जातात. आजही प्रेक्षकांच्या ते लख्ख लक्षात आहेत ते त्यांच्या दमदार भूमिकांमुळे.

आता अभिनय क्षेत्रात फारसे चर्चेत नसलेले सतिश शाह पुन्हा चर्चेत आले आहेत पण एका वेगळ्याच कारणामुळे. सतिश शाह यांनी आपल्या एका ट्वीटमधून लंडन एअरपोर्टवरील स्टाफला एक मस्त उत्तर दिलं आहे ज्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. (satish shah response to racist comment on london heathrow airport)

काही दिवसांपूर्वी लंडनच्या हीथ्रो एअरपोर्टवर सतिश शहा यांची वर्णद्वेषावरनं खिल्ली उडवली गेली. त्यांना पाहिल्यावर तिथला एअरपोर्ट स्टाफ म्हणाला की,''या लोकांना फर्स्ट क्लासचे तिकीट परवडते का?'' आणि हे असं बोलून ते खो-खो हसायला लागले.

पण सतिश शाहच ते त्यांनी या कमेंटवर अगदी कडक पलटवार केला आहे. त्यांनी ट्वीट करत त्यात लिहिलं आहे की..''मी हसून त्या स्टाफला म्हणालो..हो मला फर्स्ट क्लासचं तिकीट परवडू शकतं कारण मी भारतीय आहे. आणि हे ऐकून त्यांची बोलती बंद झाली. हीथ्रो एअरपोर्टवरचा स्टाफ मला फर्स्ट क्लास मध्ये पाहून हैराण झाला होता. तिथला एक जण मला पाहून आपल्या दुसऱ्या मित्राला म्हणू लागला,या लोकांना फर्स्ट क्लासचं तिकीट परवडतं का?'' आणि मी हे उत्तर त्यांना दिले.

सतिश शाह त्यांच्या या ट्वीटमुळे सोशल मीडियावर लोकांची वाहवा मिळवताना दिसत आहेत. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, ''वर्णद्वेष एक अशी गोष्ट आहे जिनं या विदेशी लोकांच्या डोक्यावर परिणाम केलाय,जणू याचं भूतच त्यांच्या डोक्यावर बसलं आहे. आणि उगाचच आपल्या समोर हे लोक दाखवतात की यांना वर्णद्वेषाशी काही घेणंदेण नाही''. दुसऱ्या एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'सर तुम्हाला तर तिथे बोलायला हवं होतं..भारतात दिल्ली,हैदराबादला जा,तिथले एअरपोर्ट पहा,तुमच्या हिथ्रो सारखं तिथे नाहीय. तुमच्या एअरपोर्टपेक्षा आलिशान आहेत आमचे हे एअरपोर्ट. मी अलिकडेच हिथ्रोला गेलो होतो. एकदम जुन्या मुंबईसारखं फीलिंग आलं'.

सतीश शाह यांच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर आतापर्यंत त्यांनी अनेक हिंदी-मराठी मालिकांमधनं काम केलं आहे. 'मै हूं ना','ओम शांति ओम्'',रा वन' सारख्या सिनेमातून त्यांनी एकदम दमदार काम केलं आहे. पण आजही ते 'साराभाई वर्सेस साराभाई' मालिकेतील इंद्रवदन साराभाई या भूमिकेमुळे ओळखले जातात. सतीश शाह यांना शेवटचं २०१७ मध्ये 'साराभाई वर्सेस साराभाई' मालिकेत पाहिलं होतं. या मालिकेचे केवळ १० एपिसोड ऑन एअर करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT