Pathaan Movie Shah Rukh Khan Esakal
मनोरंजन

Pathaan Movie: 'पठाण' रिलीज होण्यापूर्वी शाहरुखची हवा! मन्नत बाहेर चाहत्यांची जत्रा

Vaishali Patil

शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट प्रमोशन न करताही चर्चेत आहे. 'पठाण' चित्रपटाबाबत बराच गोंधळ सुरु आहे. काही संघटनांनी शाहरुखचे पुतळे जाळले तर काहींनी शाहरुखलाच जिवंत जाळण्याची धमकी दिली. पण शाहरुख खान आजही बॉलिवूडचा बादशाह आहे. तो आजही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो हे काही वेगळं सांगायची गरज नाही.

शाहरुखची क्रेझ ही लहानापासून मोठ्यापर्यंत आहे. शाहरुखच्या मन्नत बाहेर त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्याची गर्दी असते. मात्र यावेळी 22 जानेवारीलाही असचं चित्र पाहायला मिळालं. शाहरुखला त्याच्या 'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी 'मन्नत'च्या बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती.

शाहरुख खाननेही त्याच्या चाहत्यांना निराश केले नाही. तो त्याच्या 'मन्नत' च्या टेरेसवर आला आणि रेलिंगवर चढला. त्यांनतर त्याने जमलेल्या चाहत्यांच त्याच्या खास शैलीत आभार मानलं. त्याचं प्रेम पाहून तो भारावला.

शाहरुखला पाहताच जमावाने एकच जल्लोष केला आणि सर्वांनी शिट्ट्या वाजवून 'शाहरुख खान' च्या नावाचा जयघोष सुरू केला. मात्र चाहत्यांच्या प्रचंड गर्दीमुळे सर्वत्र वाहतुक ठप्प झाली.

याबद्दल शाहरुखने सोशल मीडियावर सर्व लोकांची आणि वाहतूक व्यवस्थापकांची माफी मागितली. शाहरुखने त्याच्या ट्विटर हँडलवर चाहत्यांचे आभार मानत एक व्हिडिओ शेअर केला. त्यात लिहिलं की , 'या अप्रतिम रविवारच्या संध्याकाळबद्दल धन्यवाद. माफ करा, लेकिन उम्मीद करता हूं कि लाल गाड़ी वालों ने अपनी कुर्सी की पेटी बांध ली थी 'पठाण'साठी तुमची तिकिटे बुक करा आणि मी तुम्हाला पुढच्या वेळी तिथेच भेटेन.

'पठाण'मध्ये शाहरुख खानशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही भूमिका आहेत. याचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. या चित्रपटाद्वारे शाहरुख खान तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या आवाहनानंतर आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! 10 ग्रॅम अन् 1 ग्रॅमसाठी आता किती रुपये मोजावे लागणार?

Aurangabad Hospital: आगीतून वाचवलेल्या जुळ्यांचा मृत्यू; एशियन हॉस्पिटलमधून दाखल केले होते 'घाटी' मध्ये, कुटुंबावर शोककळा

पुण्यात प्रसिद्ध हॉटेलमध्ये भाकरीत रबरबँड, ग्राहकानं शेअर केला VIDEO

आधी हात पकडला, नंतर कपडे काढत नको ते करण्याचा प्रयत्न, ओला चालकाचं महिलेसोबत गैरकृत्य; मध्यरात्री नवी मुंबईत काय घडलं?

Marathi News Live Updates : टीएमसी खासदार नदीमुल हक यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीचे छापे

SCROLL FOR NEXT