Shahrukh Khan sharon stone red sea film festival 2022 viral video basic instinct pathaan Google
मनोरंजन

Shahrukh Khan Video: शाहरुखला पाहून बसल्या जागेवर उडाली हॉलीवूड अभिनेत्री.. तिचे हावभाव बघाल तर..

सौदी अरेबियाच्या रेड सी फिल्म फेस्टिव्हल २०२२ मधील शाहरुखचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतोय,ज्याच्या नेटकरी प्रेमात पडलेयत.

प्रणाली मोरे

Shahrukh Khan Video: शाहरुख खानला किंग खान बोलण्यामागे एक मोठं कारण आहे आणि ते हे की तो जगभरातील लोकांच्या मनावर राज्य करतो. ४ वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर किंग खान मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय. यादरम्यान सौदी अरेबियाच्या रेड सी फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये त्याला पाहिलं गेलं. शाहरुख खानला आपल्या समोर पाहणं हे केवळ चाहत्यांसाठी नाही तर बड्या बड्या सेलिबसाठी सुद्धा पर्वणी असते याचा मोठा दाखला नुकताच मिळाला.

हॉलीवूड अभिनेत्री शेरोन स्टोननं रेड सी फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या शेजारील खूर्चीत शाहरुखला बसलेलं पाहिलं आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर जे हावभाव दिसले ते सोशल मीडियावर जोरदार व्हारल झाले आहेत. तिच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती हे तिच्या चेहऱ्यावरील हावभावांवरनं दिसत आहे.(Shahrukh Khan sharon stone red sea film festival 2022 viral video basic instinct pathaan)

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शाहरुख खानला आपण लोकांना उभं राहून अभिवादन करताना पाहतो. एवढ्यात फेस्टिव्हलची होस्ट येते आणि सगळ्यांना सांगते की आपल्या सोबत इथे आता शाहरुख खान उपस्थित आहेत,या फेस्टिव्हलचा भाग बनण्यासाठी. हे ऐकल्यावर तिथे त्यावेळी हजर असलेली हॉलीवूड अभिनेत्री शेरोन स्टोन शॉक होताना दिसते. तिला पाहून वाटतं की तिला याचा अंदाजा पहिल्यापासनं नव्हता की शाहरुख तिच्या जवळच बसला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूपच मजेदार वाटतात.

हेही वाचा: Swasthyam 2022 : शारीरिक व मानसिक सुदृढतेसाठी योगाभ्यास

रेड सी फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये शाहरुख खानला भारतीय सिनेमाला त्यानं दिलेल्या योगदानासाठी पुरस्कारानं सम्मानित करण्यात आलं होतं. कार्यक्रमात त्याचं स्वागत जोरदार टाळ्यांनी केलं गेलं. या क्षणाचा व्हिडीओ आपण पाहू शकतो जेव्हा हॉलीवूड अभिनेत्री शेरोन स्टोन शाहरुख खानला पाहून एखाद्या शाहरुखच्या चाहतीसारखी शॉक झाल्यासारखी दिसतेय. सुपरस्टारला पाहून आनंदानं ती ओरडताना दिसलीय. शेरोन आपल्या छातीवर हात ठेवत आणि तोंड उघडं ठेवून फक्त शाहरुखला न्याहाळताना दिसतेय. तिला विश्वास होत नाही की खरंच शाहरुख तिच्या समोर उभा आहे.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांना शेरोन स्टोनचे शाहरुखला पाहिल्यावरचे रिअॅक्शन भलतेच पसंतीस पडले आहेत. दुसऱ्या एका व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकतो की शाहरुखला पाहून शेरोन ओरडायला लागते आणि किंग खाननं त्यानंतर तिच्याशी संवाद देखील साधलेला दिसत आहे. शाहरुखचा हा अंदाज पाहत शेरोन स्टोन त्याच्यावर जवळजवळ फिदा झालेली दिसत आहे. यावेळी हा फॅन गर्ल मोमेंट सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा सगळ्यात फेव्हरेट मोमेंट बनताना दिसत आहे. सगळीकडे फक्त याचीच चर्चा सुरू आहे.

शाहरुख खान सध्या आपला आगामी सिनेमा 'डंकी' च्या शूटिंगसाठी सौदी अरेबियात आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार संतोषी करत आहेत. याव्यतिरिक्त रेड सी फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये शाहरुखने आपला आगामी सिनेमा 'पठाण' चे देखील प्रमोशन केलेले दिसून आले. त्यानं आपल्या सिनेमातीव संवादफेक करत उपस्थितांची दाद देखील मिळवली.

'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT