Lata Mangeshkar Health Upadate 
मनोरंजन

लता दीदींच्या प्रकृतीत सुधारणा, अद्याप आयसीयुमध्ये...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील एका रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे.

सकाळ डिजिटल टीम

गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील एका रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दीदींना दाखल करण्यात आले होते. आता एएनआयनं केलेल्या व्टिटमध्ये दीदींच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची बातमी व्हायरल झाली होती. यावेळी मंगेशकर कुटूंबियांच्यावतीनं कोणत्याही प्रकारे चुकीची माहिती पसरवू न देण्याचे आवाहन करण्यात आले होते. काल दीदींनी त्यांच्या व्टिटरवरुन चाहत्यांना आपल्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. (Bollywood Singer Lata Mangeshkar health update is improvement)

एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार दीदींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. मात्र त्यांना अजूनही आयसीयुमध्ये ठेवण्यात आले आहे. त्या बऱ्या व्हाव्यात यासाठी चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन यापूर्वी मंगेशकर कुटूंबियांनी केले होते. डॉ.प्रतीत समदानी हे दीदींवर उपचार करत आहेत. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत समाजमाध्यमांवर पसरत असलेल्या अफवांवर कोणीही विश्वास ठेऊ नये. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. लता दीदी बऱ्या होऊन घरी येण्यासाठी प्रार्थना करूया असे त्यांच्या निकटवर्तीयांनी कळवले आहे.

लता मंगेशकर यांना ९ जानेवारीला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून कोणीही अफवा पसरवू नका असे आवाहन त्यांच्या कुटूंबियांसह डॉक्टरांनीही केले आहे. चाहत्यांनी देखील दींदीच्या आरोग्य़ासाठी प्रार्थना सुरु केली आहे. एका चाहत्यानं तर दीदींच्या उपचारासाठी आपली संपूर्ण बचतठेव दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT