Lucky ali  team esakal
मनोरंजन

'आम्हाला अजूनही...': हलाल मटण प्रकरणावर लकी अलींची प्रतिक्रिया

बॉलीवूडमध्ये आपल्या अनोख्या शैलीच्या गायकीनं श्रोत्यांचे लक्ष वेधून घेणारे गायक म्हणून लकी अलींच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

सकाळ ऑनलाईन टीम

Bollywood News: बॉलीवूडमध्ये आपल्या अनोख्या शैलीच्या गायकीनं श्रोत्यांचे लक्ष वेधून घेणारे गायक म्हणून लकी अलींच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. (Entertainment News) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेल्या हलाल प्रकरणावर आता लकी अली यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर देखील ट्रोल होण्याची वेळ आली आहे. प्रसिद्ध अभिनेते मेहमुद यांचे चिरंजीव असणाऱ्या लकी अली (Lucky Ali) यांच्या गायकीनं गेल्या दोन दशकांहून अधिक काळ बॉलीवूडच्या चाहत्यांवर गारुड केले आहे. हलालचं पालन कुणी करायचं यावर लकी अलीनं दिलेल्या प्रतिक्रियेनं आता वेगळ्याच चर्चेला उधाण आल्याचे दिसून आले आहे. जे कुणी मुस्लिम धर्माचे पालन करतात त्यांना ते हलाल लागु होते. असे लकी अली यांनी म्हटले आहे.

काही कट्टर पंथियांनी हलाल मांस सेवन करण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा एका वेगळ्याच विषयाला तोंड फुटले आहे. लकी अलीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. लकी अलीनं सविस्तर पोस्ट यासंबंधी लिहिली आहे. ज्यावेळी भाजपचे राष्ट्रीय महासचिव सी टी रवि यांनी हलालची तुलना आर्थिक जिहादशी केली होती. त्यावर लकी अलीनं दिलेली कमेंट आता चर्चेत आली आहे. जे मुस्लिम धर्माचे पालन करत नाहीत त्यांना हलाल संबंधीचे नियम लागु होत नाहीत. असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

लकी अली यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, प्रिय भारतीय नागरिकांनो मला आशा आहे की, तुम्ही सगळेजण खूप आनंदी असाल. हलाल हे निश्चितच मुस्लिम व्यक्ती सोडून इतर कुठल्याही व्यक्तीला लागु होत नाही. मुस्लिम व्यक्ती अशी कोणतीही वस्तु खरेदी करणार नाहीत जी यहुदी लोकांशी संबंधित आहे. आपण अनेक गोष्टींबाबत चुकीच्या धारणा बाळगल्या आहेत. त्याचा परिणाम आपल्या विचारसरणीवर झाला आहे. अद्यापही अनेकजण चुकीच्या विचारांचे अनुसरन करत आहेत. आपल्याला जर सत्य जाणून घ्यायचे असल्यास त्याच्याशी संबंधित सगळ्या गोष्टींची पडताळणी करायला हवी. असेही लकी अलीनं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT