sona mohapatra on kangana 
मनोरंजन

'स्वार्थाशिवाय ती कोणाचीही बाजू घेत नाही', सोना मोहापात्राची कंगनावर टिका

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेत्री कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत आहे. मुंबईला पीओके म्हणाल्यानंतर कंगनाने बॉलीवूडवर देखील हल्लाबोल केला ज्यामुळे ती चर्चेत आली. नुकंतच बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्राने ट्विट केलं आहे ज्यामध्ये ती कंगना रनौतविषयी अनेक गोष्टींवर बोलली आहे.

सोना मोहापात्राने तिच्या ट्विटमध्ये म्हटलंय, 'कंगना स्वतःशिवाय कधीच दुस-या लोकांसाठी उभी राहिली नाहिये आणि ना कधी तीने त्या लोकांना कधी लक्षात ठेवलंय ज्यांनी तिचं कौतुक केलंय. ही कोणी बदल घडवून आणणारी किंवा कोणत्याही वैचारिक नेतेपदासाठी पात्र नाहीये. होय. इंडस्ट्रीमधील काही वाईट गोष्टींविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ती खूप बहादूर आहे. बस एवढंच.' तिने ट्विटमध्ये पुढे म्हटलंय, 'आणि जेव्हा अनुष्का शर्मा किंवा इतर कोणाविषयी पोस्ट केली होती. मी एवढंच म्हणेन कंगना रनौत कृपया काही स्त्रीवादी मित्र बनव आणि योग्य सल्लागार ठेव.' 

सोना मोहापात्राने कंगनावर टिका करत म्हटलं की 'महिला विक्टिम कार्ड खेळणं बंद कर.' कंगना रनौतने सोना मोहापात्राला ट्विटरवर ब्लॉक केलं आहे. याबाबतची माहिती देखील सोनाने ट्विट करत दिली. ती म्हणाली, 'मी तिला कधीच फॉलो केलं नाही मात्र मला आज याविषयी कळालं. कंगनाला प्रत्येकावर टिका करायची आहे. मात्र हे तिला कळत नाही का की जग पारस्परिकतेवर चालतं. तिने हे कळून घेतलं पाहिजे की या सगळ्या गोष्टींना कसं हाताळंलं गेलं पाहिजे.'  

bollywood singer sona mohapatra slams kangana ranaut says she has not ever stood up for anyone  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT