bollywood sisters neha and aisha sharma daughter of congress mla 
मनोरंजन

बॉलिवूडच्या 'या' ग्लॅमरस बहिणींचे वडील आहेत, काँग्रेस आमदार

वृत्तसंस्था

मुंबई : राजकारण आणि बॉलिवूड यांचे संबंध काही नवे नाहीत. काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेशनं इंडस्ट्रीत चांगला जम बसवला. तर रामविलास पासवान यांचा मुलगा चिरागनं बॉलिवूडमध्ये नशीब आजमावलं. त्यात त्याला यश आलं. सध्या बॉलिवूडमध्ये दोन बहिणी आपलं नशीब आजमावत आहेत. त्यांचे वडील काँग्रेसचे आमदार असल्याचं क्विचितच काही जणांना माहिती असावं.

नेहा शर्मा आणि आएशा शर्मा या दोन नवोदित अभिनेत्री सध्या बॉलिवूडमध्ये धडपडत आहेत. नेहा शर्मानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. पण, तिच्या अभिनयाला फारशी दाद मिळालेली नाही. ती सोशल मीडियावर मात्र, प्रचंड लोकप्रिय आहे. नेहानं, आगामी तान्हाजी सिनेमात काम केलंय. कलाकारांच्या गर्दीति त्या सिनेमात तिला कितपत संधी मिळालीय हे माहिती नाही. तिचे जयंता भाई की लव्ह स्टोरी, क्रूक्स, यंगीस्तान हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर साफ आपटले आहेत. नेहा आणखी एका पंजाबी सिनेमातही काम करत आहे. नेहाच्या तुलनेत तिची छोटी बहिणी आएशा अभिनयात उजवी असल्याची इंडस्ट्रीत चर्चा आहे. सत्यमेव जयते या सिनेमात ती जॉन अब्राहमच्या अपोझिट दिसली आहे. पण, त्यानंतर तिचा एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. नेहा आणि आएशा दोघीही सोशल मीडियावरच्या त्यांच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असतात. 

वडील काँग्रेसचे आमदार 
शर्मा भगिनींचे वडील हे बिहारमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. अजित शर्मा हे मोठे व्यावसायिक आहेत. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकीय कारकिर्द सुरू केली. सध्या ते बिहारमधील भागलपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. अजित शर्मा यांनी यापूर्वी, त्यांनी तीन वेळा विधानसभा आणि एक वेळा लोकसभा निवडणूक लढवली होती. पण, त्यात त्यांचा पराभव झाला होता. बिहारमधील काँग्रेसच्या निष्ठावान नेत्यांमध्ये अजित शर्मा यांचं नाव घेतलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Monorail : मुंबईकरांसाठी मोठी बातमी ! मोनोरेल अनिश्चित काळासाठी बंद , MMRDA ने का घेतला निर्णय ?

Asia Cup 2025 : आशिया कपमधून माघार घेतल्यास पाकिस्तान बोर्ड लागणार भिकेला? तब्बल 'इतक्या' दशलक्ष डॉलरचं होईल नुकसान

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींना डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन; 75 व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा

Karad Accident: दुर्दैवी घटना! 'कालेटेकच्या दोघांचा अपघाती मृत्यू'; भरधाव चारचाकीची मोटारसायकला पाठीमागून भीषण धडक..

मोठी बातमी! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील ‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ

SCROLL FOR NEXT