actor sonu sood
actor sonu sood  Team esakal
मनोरंजन

'माझ्या नावाची प्रतिमा केली जातेय मलीन' सोनूची कोर्टात धाव

युगंधर ताजणे

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयानं (bombay high court) महाराष्ट्र सरकारला कोविड व्हॅक्सिनच्या (covid vaccine) वितरणासंबंधी आदेश दिले होते. त्यात असे म्हटले होते की, कॉग्रेसचे आमदार जिशान सिद्धिकी आणि अभिनेता सोनु सूद यांच्या भूमिकेची चौकशी करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य प्रशासनाला देण्यात आले होते. या व्यक्तींजवळ कोरोनाचे व्हॅक्सिन कसे आले याचा तपास करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. आता याप्रकरणावरुन एक मोठी माहिती हाती आली आहे. त्या माहितीनुसार सोनु सूदनं या प्रकरणात आपल्या नावाची प्रतिमा मलीन होत असल्याचे म्हटले आहे. (bollywood sonu sood appeals to bombay high court in corona medicine case)

आपल्या विरोधात कोणी काम करत आहे. असा संशय सोनुनं (sonu sood) व्यक्त केला आहे. चित्रपट निर्माता निलेश नवलाखा (nilesh navlakha) यांनी सोनुच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. सोनुचं असं म्हणणं आहे की, माझे नाव खराब करण्यासाठी अशाप्रकारे मला त्रास दिला जात आहे. मी आतापर्यत अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत केली आहे. मी त्या कामाला प्राधान्यक्रम दिला आहे. कोरोनाच्या काळात लोकांना ऑक्सिजन बेडची गरज होती. आणि मी ती पूर्ण केली आहे. त्यांच्या मदतीला धावून गेलो आहे. त्यामुळे यात माझे काही चूकले का, असा प्रश्नही त्यानं विचारला आहे.

कोर्टानं असं म्हटलं आहे की, काही व्यक्तींनी स्वतला देवदूत समजून मदत केली आहे. त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना व्हॅक्सिन कसे आले याचा शोध पोलिसांनी घेण्याची गरज आहे. न्यायमुर्ती एस पी देशमुख आणि न्यायमुर्ती जी एस कुलकर्णी यांच्या पीठानं महाराष्ट्र सरकारला यासंबंधी आदेशही दिले आहेत.

राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांनी सांगितले की, माझगाव येथील न्यायालयात काही एनजीओच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. कारण त्यांच्याजवळ आवश्यक ती कागदपत्रे आणि परवाने नव्हते. याप्रकरणावर न्यायालयाकडून सुनावणी होणार आहे. कोर्टाकडून सोनुला दिलासा मिळणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू चहरला झाली गंभीर दुखापत, सामन्यानंतर कोचने केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT