मनोरंजन

शाहरुखचा आर्यन कसा अडकला? उद्योगपतींच्या मुलांचीही नावं

केवळ बॉलीवूडच नाहीतर देशभरातील वेगवेगळ्य़ा सेलिब्रेटींची मुलं सध्या मुंबई - गोव्याच्या त्या क्रुझ ड्रॅग्ज प्रकरणात अडकल्याचे समोर आले आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - केवळ बॉलीवूडच नाहीतर देशभरातील वेगवेगळ्य़ा सेलिब्रेटींची मुलं सध्या मुंबई - गोव्याच्या त्या क्रुझ ड्रॅग्ज प्रकरणात अडकल्याचे समोर आले आहे. हे प्रकरण जास्त चर्चेत आलं त्यामागील एक महत्वाचे कारण म्हणजे बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं नाव त्यात आल्यावर या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीनं जे ड्रग्ज जप्त केलं आहे त्यात कोकेन आणि एम डी ड्रग्जचचा समावेश आहे. आर्यन खानशिवाय त्या क्रुझवर बड्या उद्योगपतींची आणि फॅशन इंडस्ट्रीतील सेलिब्रेटींच्या मुलांचा समावेश आहे. शनिवारी कॉर्डीला द इंप्रेस नावाची क्रुज होती ज्यावर ही ड्रग्ज पार्टी चालल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ज्याठिकाणी रेव पार्टी सुरु होती तिथं पोलिसांनी छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यात अनेक मोठ्या सेलिब्रेटींच्या मुलांचा समावेश आहे. एनसीबीनं आता सगळ्यांचे ब्लड सँपल घेतले आहे. त्याच्या रिपोर्टसची माहिती अजून समोर आलेली नाही. त्यातून कोणी ड्रग्ज घेतले हे कळणार आहे. मात्र आज त्या रिपोर्टच्या आधारे एनसीबी कारवाईचं सत्र सुरु करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्या क्रुझमध्ये एका डीजेलाही बोलवण्यात आले होते त्यात त्याचे सादरीकऱण होणार होते. क्रुझवर पूल पार्टीही होती.

दिल्लीतील एका मोठ्या कंपनीनं या पार्टीचे आयोजन केले होते. त्यामुळे आयोजकही आता त्या रेव पार्टीतील प्रकरणात आरोपी म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा अशी माहिती समोर आली होती की, 2 ते 4 ऑक्टोबर दरम्यान या क्रुझचे बुकींग करण्यात आले होते. त्यानंतर 3 ऑक्टोबरला ही क्रुझ मुंबईत येणार होती. मात्र त्याचवेळी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांना टीप मिळाली. त्यात त्या क्रुझवर रेव पार्टी सुरु असून त्यात मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले होते. यावर एनसीबीनं त्या क्रुझमध्ये जेवढ्या सीट बूकींग व्हायच्या राहिल्या होत्या त्या एनसीबीनं बूक केल्या. त्यांनी अशाप्रकारे सापळा रचून ही कारवाई केली.

क्रुझचा प्रवास सुरु झाल्यानंतर काही वेळानं एनसीबीनं ही कारवाई केली. त्या क्रुझमध्ये एक हजार प्रवासी होते. आता समोर केवळ 12 हून अधिक जणांची नावं समोर आली आहे. साधारण 80 ते 90 च्या दशकामध्ये बॉलीवूडमध्ये ड्रग्जचे प्रमाण वाढले. त्याप्रकारच्या पार्ट्याही वाढल्या. गेल्या काही वर्षांपासून त्याचे प्रमाण जास्त झाल्याचेही दिसून आले आहे. अलीकडच्या काळात नव्यानं आलेल्या सेलिब्रेटींमध्ये अंमली पदार्थांचे सेवन करण्याची सवय अधिक असल्याचे काही उदाहरणावरुन दिसून आले आहे. भारतात रेव पार्टीची सुरुवात काही हिप्पींनी केली होती. जी गोव्यातून सुरु झाली. त्यानंतर हा ट्रेंड वाढत गेला. रेव पार्टीमध्ये इंजॉय करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे मोजले जातात. 2007 मध्ये पुण्यात देखील अशीच एक मोठी रेव पार्टी झाली होती. त्यात 280 जणांना अटक करण्यात आली होती.े

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT