Subhash Ghai Birthday Party Google
मनोरंजन

Subhash Ghai Birthday Party Video: 'आता कंटाळा आला..', पार्टीत ऐश्वर्याला पाहून लोक असं का म्हणू लागले?

सुभाष घई यांच्या ७८ व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जंगी पार्टी झाली,ज्यातील बॉलीवूड सेलिब्रिटींचे व्हिडीओ जोरदार चर्चेत आले आहेत.

प्रणाली मोरे

Subhash Ghai Party Video: सुभाष घई यांच्या ७८ व्या बर्थ डे निमित्तानं जंगी पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीत बॉलीवूडच्या दिग्ग्जांनी हजेरी लावली होती. पार्टीत सलमान खान व्यतिरिक्त ऐश्वर्या राय बच्चन आपला पती अभिषेक बच्चन सोबत सामिल झाली होती. यांचा पार्टीतला व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायर होताना दिसत आहे. ऐश्वर्यानं निळ्या रंगाचा सूट घातला होता. हा रंग ऐश्वर्याच्या अंगावर खूपच खुलून दिसत होता.

ऐश्वर्यानं पार्टीत अभिषेकसोबत एन्ट्री मारली अन् सोशल मीडियावर लोक तिला जबरदस्त ट्रोल करु लागले आहेत. आता लोक काय बोलू लागलेयत हे जाणून घेऊया. या व्यतिरिक्त ऐश्वर्या राय बच्चनच्या सासूबाई जया बच्चन या पार्टीत पोहचल्या होत्या, त्यांना गाडीपर्यंत ड्रॉप करायला उत्सवमूर्ती सुभाष घई स्वतः आलेले दिसले.

सुभाष घई यांच्या बर्थ डे पार्टीत ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन पार्टीत सामिल झाले होते. ऐश्वर्या आणि अभिषेकचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर लोक आता ऐश्वर्या रायला तिच्या हेअर स्टाइलवरनं ट्रोल करताना दिसत आहेत.

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, 'प्रत्येकवेळी ऐश्वर्याला एकाच हेअर स्टाइलमध्ये पाहून कंटाळा आला'. आणखी एकानं लिहिलं आहे-'ऐश्वर्याची पर्मनंट हेअर स्टाइल'. तर एकानं लिहिलं आहे की-'अगं हेअर स्टाइल बदलत नाहीस तर किमान ड्रेसिंग पॅटर्न तरी बदल'. काही लोकांनी तर ऐश्वर्या-अभिषेकच्या केमिस्ट्रीलाच 'फेक' म्हटलं आहे.

जया बच्चन देखील सुभाष घई यांच्या पार्टीत सामिल झाल्या होत्या. जया यांचा व्हिडीओ समोर आला त्यात सुभाष घई स्वतः त्यांना खूप स्पेशल ट्रीट देताना दिसले. जया बच्चन यांना त्यांच्या कारपर्यंत सोडायला खुद्द सुभाष घई आलेले दिसले.

जया यांच्या या व्हिडीओवर लोकांनी अनेक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. लोक म्हणतायत,'त्यांच्या जवळपास जी लोकं आहेत त्यांनी काळजी घ्या..बाईंना कधी राग येईल सांगता यायचं नाही'. एकानं लिहिलं आहे की-'तुम्ही सगळे मिळून यांना बॉयकॉट का करत नाही?'

हेही वाचा: ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

जया बच्चन यांचे असे अनेक व्हिडीओ याआधी समोर आले ज्यात त्या पापाराझीवर भडकताना दिसल्या. नुकत्याच एका व्हायरल व्हिडीओत त्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसल्या होत्या. यादरम्यान एक अनोळखी माणूस त्यांचे फोटो घेत होता,आणि कॅमेऱ्यात जया बच्चन यांना कॅप्चर केलेलं दिसत होतं.

त्यावेळी जया बच्चन म्हणताना दिसल्या होत्या-'माझा फोटो नका काढू..तुम्हाला इंग्रजी भाषा कळत नाही का?' यादरम्यान सुरक्षा रक्षक लोकांना बाजूला हटवताना दिसले होते आणि व्हिडीओत जया बच्चन म्हणताना दिसल्या होत्या-'अशा लोकांना नोकरीवरनं काढलं पाहिजे..'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Wedding Destination: शोधताय? हिमालयाच्या कुशीतलं हे मंदिर बनतंय नवविवाहितांचं आवडतं ठिकाण, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

SCROLL FOR NEXT