Amitabh bachchan, Lionel Messi, Cristiano Ronaldo  SAKAL
मनोरंजन

Amitabh Bachchan: दीपिका नंतर आता अमिताभ फुटबॉलच्या मैदानात.. बिग बी दिसताच रोनाल्डोनं...

सौदी अरेबिया मधील रियाध येथे हि खास मॅच होत आहे.

Devendra Jadhav

अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचं झालं तर काहीच दिवसांपूर्वी ते उंचाई सिनेमात दिसले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला. ख्रिस्तियानो रोनाल्डो गुरुवारी पुन्हा एकदा लिओनेल मेस्सीचा सामना करण्यासाठी फुटबॉलच्या मैदानावर आला.

रोनाल्डो सौदी ऑल-स्टार इलेव्हनकडून लिओनेल मेस्सीच्या पॅरिस सेंट-जर्मेनविरुद्ध मैत्रीपूर्ण सामन्यात खेळत आहे. या खास सामन्यापूर्वी भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन हे खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सौदी अरेबिया मधील रियाध येथे हि खास मॅच होत आहे.

दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या विशेष उपस्थितीने भारतीय चाहत्यांना मात्र आश्चर्यचकित केले. अमिताभ आनंदी होते आणि त्यांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे ज्यामध्ये ते मैदानावर फिरताना खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत.

अमिताभ बच्चन लिहितात, "रियाधमधील एक संध्याकाळ.. " किती छान संध्याकाळ.. क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, एमबापे, नेमार सर्व एकत्र खेळत आहेत.. आणि मी खेळाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित पाहुणा म्हणून.. PSG विरुद्ध रियाध हंगाम. अविश्वसनीय!!"

या विशेष मॅच बद्दल सांगायचं झालं कि, 2025 पर्यंत चालणार्‍या अल नासरशी करार केल्यापासून रोनाल्डो सौदी अरेबियामध्ये कोणताही फुटबॉल खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. आणि त्याची किंमत 200 दशलक्ष युरो ($214 दशलक्ष) आहे. पाच वेळचा बॅलोन डी'ओर विजेता रविवारी अल नासरसाठी सौदी प्रो लीगमध्ये पदार्पण करणार आहे.

अमिताभ बच्चन यांच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचं झालं तर काहीच दिवसांपूर्वी ते उंचाई सिनेमात दिसले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT