Urfi Javed vs Chetan Bhagat
Urfi Javed vs Chetan Bhagat Esakal
मनोरंजन

Urfi Javed vs Chetan Bhagat: उर्फीचे फोटो पोरं रात्री बिछान्यात.. तर चेतन भगत बलात्कारा प्रोत्साहन देणारा..

सकाळ डिजिटल टीम

Urfi Javed vs Chetan Bhagat: उर्फी जावेदबद्दल  काही वेगळ सांगायची गरज नाही. ती तिच्या कपडे आणि स्टाइलमूळे नेहमी चर्चेत राहते. मात्र ती फक्त फॅशनच नाही तर चोख प्रत्युत्तर देण्याच्या तिच्या शैलीमूळेही प्रसिद्ध आहे. तिच्या कपड्यावर किंवा तिच्याबदद्ल कोणी काही चुकीचं बोललं तर ते ती मूळीच खपवून घेत नाही. त्याला चोख प्रत्युत्तर देण्यापासून ती मागे हटत नाही. पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. निमित्त आहे सुप्रसिद्ध लेखक चेतन भगत. 

ते झालं असं की, चेतन भगतने 'साहित्य आजतक'मध्ये उर्फी जावेदचा उल्लेख करत म्हटलं  होतं की, 'आजकाल तरुणाई सोशल मीडियावर उर्फीच्या फोटोंना पसंती देत ​​आहे. हे कोर्समध्ये असणार आहे का? तुम्ही मुलाखतीला जाऊन म्हणाल की सर, मला उर्फी जावेदचे सगळे कपडे माहीत आहेत. तसेही त्यात त्या बिचाऱ्यीचा दोष नाही. ती तिच्या स्वतःच्या कामाची गोष्ट करत असते. ती तिचं करिअर घडवत आहे. एक भारताचा सैनिक जो बर्फात कारगिलवर बसून देशाचे रक्षण करतोय आणि एक आपला तरुण जो अंथरुणात शिरून उर्फी जावेदचे फोटो पाहत आहे. मग त्याचं काय होणार? आजही मी पाहिले उर्फीने दोन फोन घातलेले होते. 

मग काय आता उर्फी कुठं मागे राहणार होती. तिने ही  इंस्टाग्रामवर चेतन भगतची चांगलीचं खरडपट्टी काढली. तिने स्क्रीनशॉट शेअर केला त्यात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. एका यूजरने ट्विटरवर लिहिलं होतं की, चेतन भगत म्हणतात की उर्फी तरुणांची दिशाभूल करत आहे. त्यांना मिसगाइड करत आहे. यावर उर्फीने लिहिले- मित्रांनो, मीटू दरम्यान किती महिलांनी त्यांच्यावर आरोप केले होते हे विसरू नका. याच मुद्द्यावर फर्स्टपोस्टच्या मताचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यावर तिने लिहिलं आहे - जेव्हा इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर त्याच्या अर्ध्या वयाच्या मुलींना मेसेज करतात. तरीही त्या मुलींच्या कपड्यांमुळे तुमचे लक्ष विचलित झाले?

उर्फी जावेदने देखील या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे जेव्हा चेतन भगतने व्हॉट्सअॅप मेसेज व्हायरल झाल्यानंतर माफी मागितली होती. यावर तिने लिहिले - स्वतःच्या चुका मान्य करण्याऐवजी त्यांच्यासारखे पुरुष महिलांना दोष देतात. तुम्ही भ्रष्ट आहात, याचा अर्थ असा नाही की त्यात मुलीचा किंवा तिने काय परिधान केले आहे याचा दोष आहे. विनाकारण मला संभाषणात ओढलं आहे. माझ्या कपड्यांवरून तरुणांचे लक्ष विचलित होते, अशी कमेंट केली आहे. तु तसं कसं म्हणू शकतोस. तुम्हाला तरुण मुलींची आठवण येते, हे त्यांच्यासाठी विचलित होत नाही का?


त्यानतर उर्फी जावेदने चेतन भगतला सल्लाही दिला. जावेदने चेतन भगतला टॅग करत बलात्कार संस्कृतीला प्रोत्साहन न दिल्याबद्दल खडसावलं इतकच नाही तर उर्फीने चेतन भगतला उत्तर दरम्यान व्हायरल झालेल्या चेतन भगतच्या काही व्हॉट्सअॅप चॅट्स देखील शेअर केल्या. यानंतर अभिनेत्रीने एक व्हिडिओही बनवला आहे. ती म्हणते, 'पुरुषांच्या कृत्यासाठी महिलांच्या कपड्याला दोष देणारे दुसरे कोणी नसून 80 च्या दशकातील चेतन भगत आहेत. तुम्ही तुमच्या अर्ध्या वयाच्या मुलींना मॅसेज पाठवत असताना तुमचं लक्ष विचलित करणारं कोण होतं ? नेहमी स्त्रियांना दोष देऊ नका, तुमच्या उणिवाही स्वीकारा.  तुमच्यासारखे लोक तरुणांची दिशाभूल करत आहेत, मी नाही.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT