Vicky kaushal on katrina kaif and his parents reaction on marrying actress Esakal
मनोरंजन

Bollywood: कतरिनाशी लग्नाच्या निर्णयावर काय होती विकीच्या आई-बाबांची Reaction.. अभिनेत्यानेच केला खुलासा

कतरिनाच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या विकीला लग्नासाठी त्याच्या आई-वडीलांचा होकारही खूप महत्त्वाचा होता,असं त्यानं मुलाखतीत स्पष्ट केलं आहे.

प्रणाली मोरे

Bollywood: अभिनेता विक्की कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. पण दोघांचे जोडपे आजही नुकतंच लग्न झालेल्या कपल सारखं नवं नवं वाटतंय. दोघेही स्टार जेव्हा एकत्र दिसतात तेव्हा चाहते खूप खूश होतात. सध्या विकी कौशल आपला सिनेमा 'गोविंदा नाम मेरा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

या सिनेमाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखती दरम्यान विकीनं नात्यातील खरेपणावर भाष्य केलं आहे. जेव्हा त्याच्या पालकांना तो कतरिनाशी लग्न करण्यास इच्छुक आहे याविषयी कळलं तेव्हा त्यांची रिअॅक्शन काय होती यावर देखील त्यानं या मुलाखतीत खुलासा केला आहे.(Vicky kaushal on katrina kaif and his parents reaction on marrying actress)

विकी कौशलने एका मुलाखतीत म्हटलं आहे की,''मी खरेपणावर खूप विश्वास ठेवतो. फक्त रोमॅंटिक नात्यात नाही तर प्रत्येक नात्यात खरेपणा,ईमानदारी टिकवून ठेवणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. मैत्री असो,रोमॅंटिक नातं असो,भावा-बहिणीचं नातं, आई-वडील मग ते कोणतंही नातं असो..विश्वास,प्रेम आणि ईमानदारी त्यात असावी. हे माझे वैयक्तिक विचार आहेत''.

विक्की पुढे म्हणाला,''तुम्ही नात्यात इतकं खरं राहिलात तर त्याने तुम्हाला शांती आणि सुखद अनुभव मिळेल. ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षणी प्रेमाचा अनुभव घ्याल. आणि जेव्हा तुम्हाला प्रेम मिळेल तेव्हा तुम्ही फक्त घरात नाही तर बाहेर समाजातही तसेच प्रेमानं वागाल. आणि ही गोष्ट तुमच्या व्यक्तीमत्त्वाला अधिक चांगलं बनवेल असं मला वाटतं''. विकीनं या दरम्यान कतरिना कैफला जीवनसाथी म्हणून आपल्या आयुष्यात घडलेली सुंदर गोष्ट असं म्हटलं आहे.

विकीनं या मुलाखतीत कतरिना सोबत लग्नाच्या निर्णयाविषयी आई-वडीलांना सांगितल्यावर त्यांची रिअॅक्शन काय होती याविषयी देखील खुलासा केला आहे. तो म्हणाला,''माझा निर्णय ऐकून आई-वडील खूप खूश होते. त्यांना ती खूप आवडते. ती ज्या पद्धतीची मुलगी आहे,जसं वागते ते सगळंच त्यांना भावतं. मला वाटतं तुमचं मन चांगलं असेल तर तुम्ही समोरच्यातला चांगुलपणा ओळखता''.

माहितीसाठी थोडक्यात सांगतो की,विकी कौशलचा 'गोविंदा नाम मेरा' हा सिनेमा डिस्ने हॉट स्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. सिनेमात कियारा अडवाणी आणि भूमी पेडणेकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT