Happy Birthday Yami Gautam Esakal
मनोरंजन

Happy Birthday Yami Gautam: अभिनयात नव्हे तर ‘या’ क्षेत्रात असती यामी...

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमचा आज वाढदिवस आहे. हिंदी व्यतिरिक्त यामीने तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळममध्येही काम केले आहे.

Vaishali Patil

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी आणि अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री यामी गौतम ही आज तिचा 35वा वाढदिवस साजरा करत आहे. तिने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि आज बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मात्र तुम्हाला हे वाचून थोडं आश्चर्य वाटेल की यामीने करियर बनविण्यासाठी अभिनय हे क्षेत्र निवडले नव्हते तर तिला वेगळ्या क्षेत्रात करियर करायचे होते.

हिमाचल मधील बिलासपूरमध्ये २८ नोव्हेंबर १९८८ मध्ये यामीचा जन्म झाला. यामीचे वडील मुकेश गौतम हे पंजाबी इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत तर यामीची बहिण सुरीली ही एक अभिनेत्री आहे.

यामुळे तिच्या घरी अभिनयाचं वातावरण लहानपणापासूनचं होतं. यामीला मात्र वेगळ्या क्षेत्रात रस होता. ती अभ्यासात हुशार होती. यामीला नेहमीच एक आयएएस ऑफिसर व्हायचं होतं. यासाठी ती तयारीही करत होती. मात्र, अचानक तिचं मन बदललं आणि तिने मनोरंजन विश्वात एंट्री केली. अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी ती मुंबईत आली.

यामीला पहिली संधी मिळाली ती ‘चाँद के पार चलो’ या मालिकेत. या मालिकेत अभिनय करत तिने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. मात्र तिला खरी ओळख ‘ये प्यार ना होगा कम’ या मालिकेतून मिळाली. यानंतर तिने काही जाहिरातीही केल्या त्यातच ‘फेअर अँड लवली’च्या जाहिरातीतुन ती प्रसिद्ध चेहरा बनली. मात्र या फेअर नेस क्रिमच्या जाहिरीतीमुळे तिच्यावर टीकाही झाली.

त्यानंतर तिने २०१२मध्ये ‘विकी डोनर’ या चित्रपटातुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘विकी डोनर’नंतर यामीने कधी मागे वळून पाहिले नाही.

त्यानंतर ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ मध्येही तिने तिच्या अभिनयाची छाप सोडली. त्याचबरोबर तिने ‘काबील’, ‘बदलापूर’, ‘दसवी’ या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT