Bombay High Court disposes of Anushka Sharma’s plea against sales tax dues notice  sakal
मनोरंजन

Anushka Sharma: अनुष्का शर्माला हायकोर्टाचा दणका; याचिका फेटाळली..

अनुष्कानं सेल्स टॅक्स विभगाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका आज फेटाळली.

नीलेश अडसूळ

Anushka Sharma: अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. अनुष्कानं सेल्स टॅक्स विभागाने बजावलेल्या नोटीसी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु ती याचिका आज हाय कोर्टाने फेटाळून लावली आहे.

(Bombay High Court disposes of Anushka Sharma’s plea against sales tax dues notice )

अनुष्का स्वतःच्या प्रत्येक कार्यक्रमाला मालमत्ता हक्कानुसार पैसे आकारते. 2012-13 आणि 2013-14 मधील दोन कार्यक्रमांचा मिळून 2.80 इतका कर अनुष्का देणे बाकी होती. ही थकबाकी वसूल करण्यासाठी विक्री कर विभागाने तिला नोटिस दिली होती.

परंतु अनुष्काने या नोटीसविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आता अनुष्काची ही याचिका मुंबई हाय कोर्टानं फेटाळली आहे. लवादाची व्यवस्था असताना, थेट हायकोर्टात का आलात? असे अनुष्काला आज कोर्टाने सुनावले.

शिवाय अपिलीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टानं अनुष्काला दिले आहेत.  तिथे दाद नाही मिळाली तर पुन्हा हायकोर्टात येण्याची मुभा अनुष्काला देण्यात आली आहे.

अनुष्काला सेल्स टॅक्स विभागाने साल 2012-13 साठी 12.3 कोटींच्या उत्पनावर 1.2 कोटी तर साल 2013-14 साठी 17 कोटींच्या उत्पनावर 1.6 कोटी रुपये कर आकारला होता. तो अनुष्काने भरला नसल्याने ही थकबाकी वसूल करण्याची नोटीस विक्री कर उपायुक्तांनी पाठवली. त्याविरोधात अनुष्काने याचिका दाखल केली होती.

दोन्ही वर्षांसाठी आलेल्या दोन स्वतंत्र नोटीसांना अनुष्कानं दोन स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिलं. यातील एका याचिकेवर बुधवारी (29 मार्च) न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. तर दुस-या याचिकेवर आज  हायकोर्टात सकाळच्या सत्रात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये हायकोर्टानं विक्रीकर विभागाचा युक्तिवाद मान्य केला आहे. अनुष्काची याचिका फेटाळा, अशी मागणी विक्रीकर विभागानं हायकोर्टाकडे केली होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT