Raj Kundra sakal media
मनोरंजन

राज कुंद्राच्या सुटकेवर होणार २५ ऑगस्टला निर्णय...

त्यानं आतापर्यत तीन वेळा जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र तो न्यायालयानं फेटाळून लावला

युगंधर ताजणे

पॉर्नोग्राफी व्हिडिओ pornography video तयार करणे आणि ते एका अॅपच्या माध्यमातून शेयर करणे यासाठी मुंबई क्राईम ब्रँचनं mumbai crime branch शिल्पा शेट्टीचा shilpa shetty पती आणि उद्योगपती राज कुंद्राला raj kundra अटक केली होती. त्यानं आतापर्यत तीन वेळा जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र तो न्यायालयानं फेटाळून लावला. त्यानंतर त्यानं हायकोर्टात धाव घेतली. तिथे त्याला कोर्टानं दिलासा दिला. त्याच्या जामीनावर आता २५ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्याला कोर्टानं अटकेपासुन अंतरिम दिलासा दिला आहे. त्यामुळे काही अंशी का होईना राजच्या बाबत एक दिलासादायक बातमी समोर आल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. त्याची पत्नी शिल्पा शेट्टी गेल्या काही दिवसांपासून त्याच्या बाजुनं कोर्टात लढत आहे.

२०२० मध्ये सायबर पोलिसांकडे राजच्या विरोधात एक तक्रार आली होती. त्यात त्याच्यावर पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार करणे आणि ते शेयर करणे यासाठी त्याला अटक करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी देखील कोर्टात आपली बाजु मांडताना राजच्या विरोधात आपल्याकडे भक्कम पुरावे असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यानं सुटकेसाठी कितीही वेळा न्यायालयाकडे अर्ज केल्यास त्याच्यासाठी तो डोकेदुखीचा विषय ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यापूर्वी राजच्या वेगवेगळ्या कंपन्यांवर देखील पोलिसांनी छापा टाकण्यात आला होता. त्याचा पर्सनल कॉम्प्युटर, हार्ड़ डिस्क, जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर त्याची पत्नी शिल्पा शेट्टीलाही मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते.

राजचे प्रकरण शांत होत नाही तोच त्याच्या पत्नीवर आणि सासुवर लखनऊमधील एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या एका कंपनीच्या स्थापनेच्या दरम्यान काही लोकांकडून लाखो रुपये घेतले होते. आणि ते त्यांना अजूनही परत न केल्याची तक्रार त्या लोकांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात शिल्पा आणि तिच्या आईच्या विरोधातील तक्रारींची नोंद गांभीर्यानं घेतली जाऊ शकते. राजनं यापूर्वी तीनवेळा आपल्या जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र त्याला न्यायालयाकडून जामीन मिळाला नाही. पोलिसांनी राज हा विजय मल्ल्या, मेहूल चोक्सी आणि नीरव मोदी प्रमाणे देश सोडून जाण्याची शक्यता आहे. असे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते.

आता त्याला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. त्याच्या जामीनाच्या अर्जावर २५ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. राजनं आपल्या मागच्या याचिकेमध्ये असे म्हटले होते की, गेल्या वर्षी सायबर पोलिसांनी आपल्या विरोधात जी तक्रार दाखल केली होती त्यात आपले नाव नव्हते. याविषयी आपण पोलिसांना जवाबही दिला होता. असेही राजनं न्यायालयाला सांगितले. पोलिसांना आणि इतर तपास यंत्रणेला माझ्याकडून जे सहकार्य हवे होते ते मी केले आहे. सध्या राज पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार करणे आणि ते शेयर करणे याप्रकरणी तुरुंगात आहे. त्याच्या सुटकेवर अंतिम निर्णय हा २५ ऑगस्टला होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT