boney kapoor on sridevi death explained what is happened   SAKAL
मनोरंजन

Boney Kapoor Sridevi Death: "ती उपाशी राहायची कारण...", श्रीदेवीचा मृत्यूबद्दल पहिल्यांदाच बोनी कपूरने सोडले मौन

बोनी कपूरने पहिल्यांदाच श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल खुलासा केलाय

Devendra Jadhav

Boney Kapoor on Sridevi Death: २४ फेब्रुवारी २०१८ ला श्रीदेवीचा मृत्यू झाला. दुबई मध्ये हॉटेलमधील बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचा मृत्यू झाला. श्रीदेवीच्या अकस्मात मृत्यूने सर्वांनाचा धक्का बसला.

श्रीदेवीचा मृत्यू कसा झाला याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले गेले. आजपर्यंत श्रीदेवीचे पती बोनी कपूर आणि संपूर्ण कपूर फॅमिलीने याबद्दल मौन बाळगणे पसंत केलंय. पण पहिल्यांदाच बोनी कपूर यांनी श्रीदेवीचा मृत्यू कसा झाला याबद्दल खुलासा केलाय. काय म्हणाले बोनी कपूर बघा.

(boney kapoor on sridevi death explained what is happened)

"ती अनेकदा उपाशी राहायची कारण...". बोनी कपूर

न्यू इंडियनला दिलेल्या मुलाखतीत बोनी कपूर यांनी पहिल्यांदाच श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल खुलासा केला. बोनी म्हणाला, श्रीदेवी क्रॅश डाएटवर होती. ती अनेकदा उपाशी राहायची; तिला सुंदर दिसायचे होते. तिला याची खात्री करायची होती की ती चांगल्या स्थितीत राहिली तर ती ऑन-स्क्रीन चांगली दिसेल. तिने माझ्याशी लग्न केल्यापासून तिला एक-दोन वेळा ब्लॅकआउट्स आले होते आणि डॉक्टरांनी तिला लो बीपीचा त्रास असल्याचं सांगितलं."

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर बोनी कपूर यांची ४८ तास चौकशी

श्रीदेवीचा मृत्यूनंतर बोनी कपूर यांची ४८ तास चौकशी झाली हे आठवून त्यांनी खुलासा केला, “तो नैसर्गिक मृत्यू नव्हता; तो अपघाती मृत्यू होता. मी याबद्दल न बोलण्याचा निर्णय घेतला होता कारण माझी वारंवार चौकशी केली सुरु होती. मी त्यावेळी जवळजवळ 24 किंवा 48 तास याविषयी बोललो होतो. खरे तर भारतीय माध्यमांचा खूप दबाव असल्याने त्यांना आमची चौकशी करणे भाग होतो. चौकशीअंती त्यांना आढळले की त्यावेळी काही चुकीचे घडले नव्हते. मी लाय डिटेक्टर चाचण्या इतर सर्व चाचण्या केल्या. आणि मग अर्थातच, जो अहवाल आला त्यात मृत्यू अपघाती होता असे स्पष्टपणे नमूद केले गेले."

श्रीदेवीच्या मृत्यूनंतर नागार्जून भेटायला आला आणि...

बोनी कपूर पुढे असंही म्हणाले, श्रीदेवीचा मृत्यू झाल्यावर नागार्जुन शोक व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरी आला. त्यावेळी नागार्जुन म्हणालेला श्रीदेवी यापूर्वी देखील बेशुद्ध झाली होती. नागार्जुनने बोनीला सांगितले की, एका चित्रपटादरम्यान, श्रीदेवी पुन्हा क्रॅश डाएटवर होती आणि त्यामुळेच ती बाथरूममध्ये पडली आणि तिचे दात तुटले होते, कपूर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील रस्त्यांची चाळण, ठाकरे गटाकडून खड्ड्यांमध्ये झाडं लावणार

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT