Bigg-Boss 13 
मनोरंजन

#Boycott_BigBoss : नेटकऱ्यांचे गंभीर आरोप, अशाप्रकारे केला विरोध

वृत्तसंस्था

मुंबई : भारतातला सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे 'बिग बॉस'. सध्या बिग बॉसचं तेरावं पर्व चालू आहे. बिग बॉस शो हा कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. घरातील वाद विवाद, अफेअर आणि दिले जाणारे टास्क यांमुळे हा शो चर्चेचा विषय ठरतो. आताही तो अशाच एका कारणाने चर्चेत आहे आणि यावेळी बिग बॉस शोच्या अडचणीत वाढ झाली आहे. अवघ्या काही दिवसांतच हा शो बॉयकॉट करण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. 

शोमध्ये दाखविण्यात येणाऱ्या सीनवर आक्षेप घेत प्रेक्षकांनी इंटरनेटवर #Boycott_BigBoss हा हॅशटॅग वापरत विरोध केला आहे. शोमध्ये ज्यापद्धतीने मुली मुलांसह बेड शेअर करीत आहेत, हिंदू संस्कृतीची प्रतिमा मलिन करण्यात आहे आणि लव जिहादला प्रोस्ताहन देण्यात येत आहे अशाप्रकारचे मत लोकांकडून व्यक्त केलं जात आहे. या शोला बंद करण्याची मागणीदेखील नेटकऱ्यांनी व्यक्त केली.

बिग बॉसने दिलेल्या एका टास्कमध्ये घरातील सदस्य एकमेकांना तोंडाद्वारे गोष्टी पास करताना दिसत आहेत. या टास्कचे फोटो शेअर करत लोकांनी ट्विटच्या माध्यमातून विरोध दर्शविला. अशाप्रकारच्या गोष्टींना प्रोत्साहन देऊन हा शो संस्कृतीला धक्का लावत आहेत असं मत व्य़क्त केलं गेलं. 
हा शो 'लव जिहाद' ला प्रोत्साहन देत असल्याचे गंभीर आरोप लावले जात आहेत. शोने फॉरमेटमध्ये काही बदल केले आहेत. शोमधील महिला स्पर्धकांना पुरुष स्पर्धकांपैकी एकाला आपला एक BFF (बेड फ्रेंड फॉरेवर) निवडून त्यासोबत बेड शेअर करावा लागणार होता. या घटनेनंतरच अनेक आक्षेपार्य़ सीन शोमध्ये दाखिवण्यात आले. त्यानंतरच या वादाला तोंड फुटले. सध्या  #Boycott_BigBoss आणि #जिहादी_बिगबॉस असे हॅशटॅग ट्रेंडिगमध्ये आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: धुळे जिल्ह्यातील देशशिरवाडे येथे १.५ टन गोमांस जप्त

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT