Mukesh Khanna On LSC esakal
मनोरंजन

Mukesh Khanna On LSC : 'हिंदू आता...' शक्तिमान पुन्हा बोलला!

एकीकडे आमिरच्या लाल सिंग चढ्ढावरुन वाद रंगला असताना दुसरीकडे त्याच्या बाजुनं बॉलीवूडमधील (Bollywood Movies) सेलिब्रेटी प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

Mukesh Khanna On Aamir Khan Laal Singh Chaddha Boycott : मनोरंजन विश्व सध्या वेगवेगळ्या घडामोडींनी चर्चेत आले आहे. एकीकडे आमिरच्या लाल सिंग चढ्ढावरुन वाद रंगला असताना दुसरीकडे त्याच्या बाजुनं बॉलीवूडमधील (Bollywood Movies) सेलिब्रेटी प्रतिक्रिया देताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून आमिर खानच्या लाल सिंग चढ्ढानं वेगळं वातावरण तयार केलं (Entertainment News) असून नेटकऱ्यांनी त्याच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. काहीही झालं तरी हा चित्रपट पाहायचा नाही, त्य़ाच्यावर बहिष्कार घालायचा अशी भूमिका घेतली आहे. यासगळ्यात शक्तिमान फेम मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळ्या प्रतिक्रियांसाठी चर्चेत असणाऱ्या मुकेश खन्ना यांनी आमिरच्या लाल सिंगवर व्यक्त केलेली भूमिका नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय आहे.

मुकेश खन्ना यांचा आगामी प्रोजेक्ट हा शक्तीमानवरच आहे. त्याचे बजेट हे तीनशे (laal Singh chaddha trolled) कोटी रुपयांचे आहे. सोनी टेलिव्हिजनच्या शक्तिमान या चित्रपटात दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासगळ्याचे प्रमोशन सुरु असताना मुकेश खन्ना यांची लाल सिंग चढ्ढावरील प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. आमिरचा लाल सिंग चढ्ढा हा नेटकऱ्यांकडून ट्रोल केला जात आहे. त्याचा मोठा फटका आमिर खानला बसला आहे. त्यामुळे बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी आमिरच्या वतीनं प्रतिक्रिया दिली आहे. त्यात अर्जुन कपूर, सुनील शेट्टी, करिना कपूर, आलिया भट्ट, राम गोपाल वर्मा यांच्या नावाचा समावेश आहे.

बॉक्स ऑफिसवर लाल सिंग चढ्ढा मोठ्या प्रमाणात हिट होईल असे सांगितले जात होते. मात्र तसे न होता आमिरला फ्लॉप चित्रपट म्हणून लाल सिंग चढ्ढाचे अपयश स्विकारावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. शक्तिमान फेम मुकेश खन्ना यांची प्रतिक्रिया चर्चेत आहे. ते म्हणाले, आपण आमिरच्या गेल्या काही फिल्म पाहिल्या तर त्या अयशस्वी झाल्याचे दिसून येईल. आता त्या चित्रपटातील कंटेट खराब आहे की, त्याच्या गेल्या काही विधानांमुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल. मला वाटतं सध्याचे आमिरचे जे प्रकरण आहे ते जास्त गंभीर आहे. त्याला वेगवेगळे संदर्भही आहेत.

लोकांनी एवढं आक्रमक होणं हे काही एका दिवसाचे काम नाही. त्यात काहीच तथ्य़ नाही असेही नाही. यापूर्वी असं कधी झालं नाही. यापूर्वी पद्मावत, लक्ष्मी, तांडव सारख्या कलाकृतींवरुन वाद झाला होता. मात्र आमिरची ही पहिलीच अशी केस आहे की, त्यात त्याला त्याच्या कलाकृतीवरुन नव्हे तर त्याच्या यापूर्वीच्या विधानांवरुन प्रतिक्रिया मिळाली आहे.

बॉयकॉट बॉलीवूडचा मोठा फटका भारतीय मनोरंजन विश्वाला बसतो आहे. त्यामुळे आपण त्याचा गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे. यासगळ्यात निर्माते आणि दिग्दर्शकांनी या मुद्दयावर विचार करावा. आपल्याला अशाप्रकारे का ट्रोल केले जात आहे त्याचा अभ्यास करावा. आता असं वाटतं की, हिंदू लोकं अचानक जागे झाले आहेत. त्यामुळे त्यांनी अशाप्रकारे ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT