boyfriend birthday wish to ashvini mahangade from aai kuthe kay karte  SAKAL
मनोरंजन

Ashvini Mahangade: "तुझ्या नानांना दिलेला शब्द...!", अश्विनीच्या बॉयफ्रेंडने व्हिडीओ शेअर करत केलं हॅपी बर्थडे

अश्विनी महांगडेचा आज वाढदिवस आहे

Devendra Jadhav

Ashvini Mahangade Birthday: आई कुठे काय करते मालिकेतुन प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. अश्विनीचा आज वाढदिवस.

अश्विनीला तिचे हजारो फॅन्स वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच अश्विनीचा बॉयफ्रेंड निलेश जगदाळेने तिला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

(boyfriend birthday wish to ashvini mahangade from aai kuthe kay karte)

अश्विनीचा बॉयफ्रेंड व्हिडीओ शेअर करताना लिहीतो की...

अश्विनीचा बॉयफ्रेंड निलेशने एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत दोघेही गप्पा मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करुन निलेश लिहीतो, "या आपल्या ८ वर्षांच्या प्रवासात खुप चढ- उतार, सुख-दुःख पाहीले, खुप लोकांचा सहवास लाभला, काहींनी जोडून ठेवले तर काहींनी तोडले पण त्यातूनही कायम राहिले ते आपण ८ वर्षांपूर्वी जोडलेले नातं."

अश्विनीचा बॉयफ्रेंड पुढे लिहीतो, "आईने सागितल्याप्रमाणे माणूस नेहमी मोठा असायला हवा व ते कायम जपायला हवे. नानांना दिलेल्या शब्दांपासून कधी मागे हटणार नाही, कायम सोबत आहे. वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा बछडी, खुप मोठी हो. Love You अश्विनी. तिला बोलायला आवडते आणि मला ऐकायला."

अशा खास रोमॅंटीक अंदाजात अश्विनीने बॉयफ्रेंडला शुभेच्छा दिल्यात.

अश्विनीचा बॉयफ्रेंड काय करतो?

काही दिवसांपुर्वी अश्विनीने तिच्या आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या नात्याचा खुलासा केलाय. अश्विनीच्या बॉयफ्रेंडचं नाव निलेश जगदाळे.

निलेश हा व्यावसायिक आहे. The Farmotsav या दूध उत्पादक संबंधी कंपनीचा आणि FLYING ANGEL या ब्युटी प्रॉडक्ट कंपनीचा तो फाऊंडर आहे. याशिवाय मोरया प्रॉडक्शनच्या माध्यमातुन तो अनेक गाणी आणि सिनेमांची निर्मिती करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT