boyz 3 marathi movie success party and announce boyz 4 movie is coming sakal
मनोरंजन

Boyz 4: तरुणाई करणार कल्ला! तीन भागांच्या यशानंतर येतोय 'बोईज् 4'..

काहीशा बोल्ड आणि चावट अंदाजाने तरूणांना भुरळ घालणारी 'बोईज्' चित्रपटाची सिरिज प्रचंड प्रतिसादामुळे अजून वाढतेच आहे.

नीलेश अडसूळ

Boyz 3 movie: विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'बॉईज', 'बॉईज २' ला जसा प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, तसेच प्रेम प्रेक्षकांनी 'बॉईज ३'लाही दिले. 'बॉईज ३' मधील ढुंग्या, धैर्या आणि कबीरची धमाल यात तिप्पट पटीने वाढली. यात त्यांना साथ दिली ती कीर्तीने. बॉक्स ऑफिसवर करोडोंचा गल्ला जमावणाऱ्या 'बॉईज ३'ने अक्षरशः धुमाकूळ घातला. सर्वत्र 'हाऊसफुल'चा बोर्ड मिरवणाऱ्या या चित्रपटाचे मॉर्निंग शोजही फुल्ल होते. काही ठिकाणी तर या चित्रपटाचे शोजही वाढवण्यात आले. इतके यश मिळवल्यानंतर या चित्रपटाच्या टीमने नुकतीच सक्सेस पार्टी साजरी केली. या वेळी चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत सिनेसृष्टीतील काही कलाकार मंडळी, मित्रपरिवार, मीडियाचा या पार्टीत सहभाग होता. यावेळी एक मोठी घोषणाही करण्यात आली.

(boyz 3 marathi movie success party and announce boyz 4 movie is coming)

चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरुखकर म्हणतात, '' याचे श्रेय 'बॉईज ३'च्या संपूर्ण टीमला जाते. कारण पडद्यावर दिसणाऱ्या आणि पडद्यामागे धावपळ करणाऱ्या प्रत्येकाची ही मेहनत आहे. या यशात प्रेक्षकांचाही सहभाग मोठा आहे. कारण त्यांच्या प्रेमामुळेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो. 'बॉईज' आणि 'बॉईज २' ला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले म्हणूनच आम्ही 'बॉईज ३' प्रेक्षकांच्या भेटीला आणला आणि आता लवकरच 'बॉईज ४' ही आपल्या भेटीला येणार आहे. यात ही धमाल आणखी चौपट होणार आहे.''

सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रॉडक्शन अंतर्गत एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया आहेत. 'बॉईज ३' मध्ये सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड, ओंकार भोजने आणि विदुला चौगुले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pre-Monsoon Rain Alert India : पुढील तीन दिवसांत मुसळधार पाऊस; IMD कडून 'या' राज्यांना अलर्ट जारी, एल निनोचं संकट तरीही 2026 मध्ये धो-धो कोसळणार!

inspiring Story: ६७ वर्षीय ‘तरुणा’ची कमाल! वर्षभराच्या श्रमदानातून डोंगर खोदून साडेतीन किमी रस्ता तयार, नानांची जिद्द ठरली आदर्श..

कौटुंबिक वादातून आईने अडीच वर्षांच्या मुलाला पाच लाखात विकलं, धक्कादायक प्रकरण समोर; कुठं घडला प्रकार?

Shwetank Tambe: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधील तरुण नेत्याचं अपघाती निधन; घटनेनं हळहळ

NSE Gold: आता Demat मध्येही ठेवता येणार सोनं! NSE ची नवी डिजिटल गोल्ड योजना सुरू; नेमकं काय आहे EGR?

SCROLL FOR NEXT