boyz 4 box office collection in 10 days gaurav more abhinay berde ritika shrotri  SAKAL
मनोरंजन

Boyz 4 Box Office Collection: 'बॉईज 4' हिट की फ्लॉप? १० दिवसाचा बॉक्स ऑफीस रिपोर्ट समोर

बॉईज 4 सिनेमाचा बॉक्स ऑफीस रिपोर्ट समोर आलाय

Devendra Jadhav

Boyz 4 Box Office Collection News: बॉईज 4 सिनेमा काही दिवसांपुर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाची सर्वांना उत्सुकता होती. रिलीजपुर्वीपासुनच बॉईज 4 सिनेमा लोकांच्या चर्चेचं कारण ठरला.

बॉईज 4 सुपरहिट ठरला की फ्लॉप झाला, याचं उत्तर समोर आलाय. गेल्या दहा दिवसातला बॉईज 4 बॉक्स ऑफीस रिपोर्ट समोर आलाय. जाणुन घ्या.

(boyz 4 box office collection in 10 days)

बॉईज 4 चा बॉक्स ऑफीस रिपोर्ट

बॉईज येणार तर बॉक्स ऑफिसवर पण राडा होणार! सुपरहिट 'Boyz4' ची धमाकेदार कमाई.. असं कॅप्शन देत बॉईज 4 चा बॉक्स ऑफीस रिपोर्ट समोर आलाय.

गेल्या १० दिवसात बॉईज 4 ने ४.२० कोटीची कमाई केलीय. त्यामुळे बॉक्स ऑफीसवरील कमाई बघता बॉईज 4 लोकांना आवडत असुन सुपरहिट झालाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

बॉईज 4 मध्ये असलेले कलाकार

'बॉईज ४' सिनेमा काही दिवसांपुर्वी रिलीज झाला. या सिनेमात धैर्या, ढुंग्या आणि कबीरच्या गँगमध्ये नवीन बॉईजही सहभागी झाले आहेत. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत 'बॅाईज ४' मध्ये आता ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे दिसणार आहेत. याव्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

बॉईज 4 ची OTT वर कधी? आणि कुठे?

'बॉईज ४'ची सिनेमा २० ऑक्टोबरला सगळीकडे रिलीज झाला. बॉक्स ऑफीस रिपोर्ट पाहता 'बॉईज ४' सिनेमा पाहायला युवा वर्गाने चांगलीच गर्दी केलेली दिसतेय.

'बॉईज ४' सिनेमा OTT वर कधी येणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर 'बॉईज ४' OTT वर कधी येणार याची निश्चित डेट समोर आली नसुन सिनेमा लवकरत प्राईम व्हिडीओवर पाहता येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT