boyz 4 released on ott amazon prime video starring gaurav more nikhil bane marathi movie SAKAL
मनोरंजन

Boyz 4: गौरव मोरेचा बॉईज 4 सिनेमा OTT वर रिलीज! कुठे आणि कसा बघायचा? जाणून घ्या

सुपरहिट सिनेमा बॉईज 4 आता घरबसल्या OTT वर पाहता येणार आहे

Devendra Jadhav

Boyz 4 OTT: काही दिवसांपुर्वी बॉईज 4 सिनेमा रिलीज झाला. गौरव मोरेने या सिनेमात विविध लूक करुन प्रेक्षकांना खळखळून हसवलं. बॉईज फ्रँचायजीमधला हा चौथा सिनेमा. याशिवाय बॉईज हा पहिला मराठी सिनेमा आहे ज्याचे चार भाग आलेत.

काही जणांनी बॉईज 4 थिएटरमध्ये एन्जॉय केला तर काहींचा पाहायचा राहायचा असेल. अशा लोकांसाठी आनंदाची बातमी. बॉईज 4 आता घरबसल्या OTT वर पाहता येणार आहे. कुठे आणि कसा? जाणुन घ्या.

बॉईज 4 या OTT वर झाला रिलीज

बॉईज 4 हा सिनेमा आता OTT वर पाहायला मिळणार आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा सिनेमा रिलीज झालाय. काल १६ नोव्हेंबरला हा सिनेमा अमेझॉन प्राईम OTT वर रिलीज झालाय.

त्यामुळे सर्वांना आता बॉईज 4 घरबसल्या पाहता येणार आहे. बॉईज 4 ज्यांनी आधीच पाहिलाय त्यांना पुन्हा पाहता येईल तर बॉईज 4 ज्यांचा पाहायचा राहिलाय त्यांना सहकुटुंब सिनेमा पाहता येईल.

बॉईज 4 चा बॉक्स ऑफीस रिपोर्ट

बॉईज 4 ने बॉक्स ऑफीसवर सुपरहिट कामगिरी केलीय. बॉईज 4 सिनेमाने १० दिवसात बॉईज  ४.२० कोटीची कमाई केलीय.

त्यामुळे बॉक्स ऑफीसवरील कमाई बघता बॉईज 4 लोकांना आवडला असुन सिनेमा सुपरहिट झालाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

बॉईज 4 मध्ये असलेले कलाकार

'बॉईज ४' सिनेमा काही दिवसांपुर्वी रिलीज झाला. या सिनेमात धैर्या, ढुंग्या आणि कबीरच्या गँगमध्ये नवीन बॉईजही सहभागी झाले आहेत.

सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड यांच्यासोबत 'बॅाईज ४' मध्ये आता ऋतिका श्रोत्री, अभिनय बेर्डे, निखील बने, गौरव मोरे, रितुजा शिंदे, जुई बेंडखळे दिसणार आहेत.

याव्यतिरिक्त या चित्रपटात गिरीष कुलकर्णी, यतीन कार्येकर, समीर धर्माधिकारी आणि ओम पाटील यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT