Bajrang Dal Protest Against Brahmastra  esakal
मनोरंजन

Brahmastra वरुन उज्जैनमध्ये वाद, देव दर्शनाविना परतले रणबीर अन् आलिया

नेमकं काय ज्यामुळे रणबीर कपूर आणि आलिया भट माघारी फिरावे लागले?

सकाळ डिजिटल टीम

Bajrang Dal Protest Alia Bhatt, Ranbir Kapoor : चित्रपट 'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनसाठी रणबीर कपूर, आलिया भट आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी मंगळवारी उज्जैनमध्ये होते. मात्र महाकालच्या दर्शनापूर्वीच त्यांना मोठ्या विरोधाला सामना करावा लागला. चित्रपटाची टीम महाकालच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचण्यापूर्वी मोठ्या संख्येने बजरंग दलाचे (Bajrang Dal) कार्यकर्ते मंदिराच्या प्रवेशद्वारावर जमले.

त्यांनी श्रीरामच्या घोषणा देत निदर्शने सुरु केली. रात्री उशीरा अयान मुखर्जीने महाकालचे दर्शन घेतले. बाबाचे दर्शन घेऊन अयान मुखर्जीने चित्रपट यशस्वी करण्याचे साकडे घातले. माझी इच्छा होती की चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच महाकालचे दर्शन करावे, जी आज पूर्ण झाली, असे त्याने सांगितले.

दुसरीकडे निदर्शनाची बातमी ऐकताच आलिया भटने (Alia Bhatt) मंदिराला जाण्यास नकार दिला. सोशल मीडियावर आलियाने एक व्हिडिओ शेअर करत सांगितले होते, की ती मंगळवारी टीमसोबत महाकालच्या दर्शनासाठी उज्जैनला जाणार आहे. दरम्यान जेव्हा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला.

यात पोलिसांबरोबर त्यांची झटापाट झाली. दुसरीकडे विरोध वाढत असल्याचे पाहाताच जिल्हाधिकारी आशिष दास यांनी चित्रपटाच्या टीमला सुरक्षित आपल्या निवासस्थान घेऊन गेले.

यासाठी विरोध

सूत्रांनुसार बजरंग दल म्हणते, की चित्रपटात गौमातावरुन रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) चुकीचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी विरोध केला. पोलिसांनी बजरंग दलाचा कार्यकर्ता दिलीपला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT