Junior NTR  esakal
मनोरंजन

Brahmastra : नाराज चाहत्यांपुढे झुकले ज्युनिअर एनटीआर ! मागितली माफी

नाराज चाहत्यांपुढे झुकले ज्युनिअर एनटीआर !

सकाळ डिजिटल टीम

Brahmastra Junior NTR : रणबीर कपूर आणि आलिया भट यांची मुख्य भूमिका असलेला 'ब्रह्मास्त्र' प्रदर्शित होण्याची तारीख जवळ आली आहे. निर्माते आणि कलाकार या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. 'ब्रह्मास्त्र'ची टीम वेगवेगळ्या शहरांना भेट देऊन या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

याच अनुषंगाने शुक्रवारी हैदराबादमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

पण, शेवटच्या क्षणी हा कार्यक्रम रद्द झाला. विशेष म्हणजे ज्युनियर एनटीआरही पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते. मात्र कार्यक्रम रद्द झाल्यानंतर सारे काही गुलदस्त्यातच राहिले. यामुळे चाहत्यांना प्रचंड राग आला. ज्युनियर एनटीआरने नाराज चाहत्यांची माफी मागितली आहे.'ब्रह्मास्त्र'च्या प्रमोशनसाठी हा कार्यक्रम हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये होणार होता.

ज्युनियर एनटीआर व्यतिरिक्त आलिया भट (Alia Bhatt), रणबीर कपूर (Ranbir Kapoor), करण जोहर आणि नागार्जुन देखील या कार्यक्रमात सहभागी होणार होते. कार्यक्रम सुरू होण्यास थोडा वेळ होता तो रद्द करण्यात आला. त्यामुळे चाहत्यांना प्रचंड दु:ख झाले. इतकेच नाही तर काही चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी असून त्यांनी याबद्दल स्टारने माफी मागावी अशी मागणी केली आहे.

संतप्त चाहत्यांचे मन वळवण्यासाठी, ज्युनियर एनटीआरने (Junior NTR) त्यांचा मान राखला. पत्रकार परिषदेत अभिनेत्याने माफी मागितली आहे. वास्तविक, मीडियाशी बोलताना एनटीआर म्हणाला, मला माझ्या चाहत्यांची माफी मागायची आहे. या सोबतच मला राष्ट्रीय मीडिया आणि तेलुगू मीडियाचीही माफी मागायची आहे. पोलिसांच्या परवानगीअभावी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

वृत्तानुसार, हैदराबाद पोलिसांनी गणपती विसर्जनासाठी कर्मचारी तैनात केले आहेत. अशा परिस्थितीत ‘ब्रह्मास्त्र’च्या कार्यक्रमासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करता आला नाही. रिपोर्ट्समध्ये असा दावाही केला जात आहे की, शहरात एक राजकीय मेळावाही होता. त्यामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT