Shah Rukh Khan And Brahmastra esakal
मनोरंजन

'ब्रह्मास्त्र'मध्ये शाहरुख वेगळ्या रुपात, वानर अस्त्र बनला अभिनेता

'ब्रह्मास्त्र'मध्ये शाहरुख खान वेगळ्या रुपात

सकाळ डिजिटल टीम

Brahmastra Shah Rukh Khan : रणबीर कपूर आणि आलिया भटचा बहुप्रतिक्षित चित्रपट ब्रह्मास्त्र ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटावरुन तसेही सोशल मीडियावर नकारात्मक घंटा वाजत आहे. त्यामुळे ब्रह्मास्त्र हिट होईल का ही शंका निर्माण झाली आहे. बायकाॅट ट्रेंड दरम्यान आता निर्माते वानर अस्त्रच्या भूमिकेवरुन पडदा हटवून छोटीशी क्लिप शेअर केली आहे.

ब्रह्मास्त्रमध्ये शाहरुखही

करण जोहर, आलिया भट (Alia Bhatt) यांना हे क्लिप शेअर केले आहे. वानर अस्त्राच्या भूमिकेत शाहरुख खान दिसत आहेत. मात्र किंग खानचा चेहरा व्यवस्थित दाखवला गेलेला नाही. मात्र चाहत्यांनी एक झलक पाहून समजले की हा शाहरुख खानच (Shah Rukh Khan) आहे. भले शाहरुखचे चाहते आपल्या आवडत्या अभिनेत्याला कसे ओळखणार नाही.

तसेही शाहरुखच्या वानर अस्त्र भूमिकेची काही दिवसांपूर्वी छायाचित्रे व्हायरल झाली होती. आताच्या क्लिपमध्ये फाईट सीन दाखवला गेला आहे. वानर अस्त्र बनलेले किंग खान पूर्ण अॅक्शनमध्ये दिसत आहे.

चित्रपटात शाहरुखचा कॅमियो रोल आहे. जे लोक शाहरुख खानचे दीर्घकाळापासून चंदेरी पडद्यावर पाहू शकले नाहीत त्यांच्यासाठी ही क्लिप सुखद धक्का होता. चाहते या चित्रपटात किंग खानला पाहण्यासाठी खूपच उत्साही असल्याचे दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT