Bramhastra movie  esakal
मनोरंजन

Bramhastra: सगळी आकडेवारी खोटी! PVR CEO चा मोठा गौप्यस्फोट

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्र दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

युगंधर ताजणे

Bramhastra Movie Collection: अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रम्हास्त्र दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यासगळ्यात पुन्हा एकदा बॉयकॉट ब्रम्हास्त्र असा ट्रेंड सुरु झाला आहे. ब्रम्हास्त्रमुळे (Bollywood Movies) चित्रपटगृहांना आठशे कोटींचा फटका बसल्याची आकडेवारी समोर आली आहे. व्हायरल झालेल्या त्या पोस्टवर आता पीव्हीआरच्या सीईओंनी पोलखोल केली आहे. खरी आकडेवारी काय आहे, आणि कशाप्रकारे ब्रम्हास्त्रबाबत खोटा प्रचार होतो आहे याविषयी त्यांनी ट्विटकरुन माहिती दिली आहे. काल या चित्रपटानं देशभरातून 41 कोटींची कमाई केली आहे. तर पहिल्याच दिवशी 36 कोटींचा आकडा चित्रपटानं गाठला होता.

सोशल मीडियावर एक रिपोर्ट व्हायरल झाला आहे. त्यामध्ये असं म्हटलं गेलं आहे की, ब्रम्हास्त्रमुळे बॉलीवूडला आठशे कोटींचे नुकसान झाले आहे. त्यावर मल्टीप्लेक्सचे पीव्हीआर चेनच्या सीईओ कमल ज्ञानचंदांनी यांनी आकडेवारी व्हायरल केली आहे. त्यामध्ये त्या रिपोर्टला चुकीचे म्हटले आहे. कुणीतरी जाणीवपूर्वक या चित्रपटाच्या बाबत नकारात्मक प्रतिक्रिया देत आहे. त्याच्याविरोधात चुकीचा प्रचार आणि प्रसार केला जात आहे.

ज्ञानचंदानी यांनी आपल्या व्टिटमध्ये लिहिलं आहे की, सोशल मीडियावर ब्रम्हास्त्रवरुन वेगवेगळ्या प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहे. निगेटिव्ह गोष्टींचा प्रचार केला जात आहे. त्यामुळे आपण सर्व गोंधळून जात आहोत. खरं कलेक्शन किती झाले याची आकडेवारी समोर येण्याची गरज आहे. एकतर लोकं या चित्रपटाच्या विरोधात मुद्दामून काही गोष्टी पसरवत चालले आहेत किंवा त्यांना काहीही माहिती नाहीये. पीव्हीआरकडे असलेल्या आकडेवारीनुसार या चित्रपटानं पहिल्या दिवशी आठ कोटींची कमाई केली आहे. असं ओपनिंग यापूर्वी सुर्यवंशी, गंगुबाई काठियावाडी, आरआरआर आणि केजीएफला मिळालं आहे.

गेल्या काही वर्षांपासून दिग्दर्शक अयान मुखर्जी हे ब्रम्हास्त्रवर मेहनत घेताना दिसून येत आहे. त्यांनी हा आपला ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे म्हटले आहे. तब्बल चारशे कोटींपेक्षा अधिक रुपयांमध्ये हा चित्रपट तयार झाल्यानं त्याला ही रक्कम वसूल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हिट व्हावं लागणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपये हे सोशल मीडिया प्रमोशनसाठी खर्च करण्यात आले आहे. सेलिब्रेटींनी देखील वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन प्रमोशन करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. असं म्हटलं जात आहे की, या आठवड्या शेवटी हा चित्रपट शंभर कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT