मनोरंजन

भूपतीच्या पोस्टरनं वेधलं लक्ष, चर्चा 'ब्रेकपॉइंटची'

युगंधर ताजणे

काही वर्षांपूर्वी त्या दोन्ही टेनिसपटूंच्या नावाला मोठं वलय होतं. टेनिसविश्वात त्यांनी आपल्या खेळानं मोठं नाव कमावलं होतं. टेनिस म्हटलं भारताची ती जोडी आजही सर्वांच्या लक्षात आहे. महेश भूपती आणि लिएंडर पेस यांच्यातील वाद आणि टेनिसविश्वाची झालेली हानी प्रेक्षक विसरलेले नाहीत. यासगळ्या कटू - गोड आठवणींना उजाळा देणारा ब्रेक पॉइंट हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. ब्रेकपॉईंट, एक अशी सीरीज आहे, जी देशातील सर्वात मोठ्या टेनिस हीरो लिएंडर पेस आणि महेश भूपति यांच्याविषयीच्या चर्चेबाबत वेगळं भाष्य करते. झी5 सोबतच्या आपल्या पहिल्या भागीदारीमध्ये, फिल्म निर्माता अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी यांचा बॅनर अर्थस्काय पिक्चर्सद्वारे 'ब्रेकपॉइंट' सादर करण्यात येत आहे. सात भागांची ही श्रृंखला लवकरच झी 5 वर उपलब्ध होणार आहे.

लिएंडर पेस आणि महेश भूपति यांच्या ब्रोमॅन्सपासून ब्रेकअप पर्यंतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे झी5 च्या आगामी वेब-सीरीजमध्ये मिळणार आहेत. ही देशातील या दोन सर्वात प्रशंसित खेळाडूंच्या मैत्री, बंधुता, भागीदारी, विश्वास, कठोर मेहनत आणि महत्वाकांक्षांवर आधारित मालिका आहे. ही जोडी 1990 च्या दशकातील सर्वात खतरनाक जोडगोळी राहिली असून 1999 मध्ये जगातील सर्वोच्च स्थानावर राहिली होती. मात्र, हे त्यांच्या कडवट ब्रेकअपवर देखील प्रकाश टाकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही दोन मित्रांची कहाणी आहे ज्यांनी, यशस्वीतेची योजना बनवली होती मात्र यशस्वीतेनंतरच्या आयुष्याची नाही. सध्या व्हायरल झालेल्या या दोन पोस्टर्समध्ये लिएंडर आणि महेश यांना दाखवण्यात आले असून त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता चाळवली आहे.

टेनिस दुहेरी जोडी ही भारताची शान होती आणि त्यांचा ब्रोमॅन्स जगभरात सर्वांनी नावाजला होता. पेस आणि भूपती ही अनेक वर्षे टेनिस विश्वातील प्रमुख नावे होती आणि त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत प्रत्येकी 8 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. ते भारतातील सर्वात यशस्वी टेनिसपटू आहेत ज्यांनी अनेक तरुणांना हा खेळ खेळण्यास प्रेरित केले. लिअँडर आणि महेश ही पहिली दुहेरी टीम होती जी 1999 मध्ये चारही ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. 1952 नंतर प्रथमच असा पराक्रम घडला होता. मग ते कशामुळे वेगळे झाले? झी 5 च्या लवकरच येणाऱ्या 'ब्रेकपॉईंट' या मालिकेत या सगळ्याचा उलगडा होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Country Cricket : भांडण बीसीसीआय अन् पीसीबीचं; तिकडं इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे ह्रदयाचे ठोके का वाढले?

Manifesto : केवळ घोषणा, अंमलबजावणी नाही! जाहीरनाम्यांपासून ज्येष्ठ नागरिक दूरच असल्याची खंत

MPSC Exam : लोकसेवा आयोगाचं शुद्धीपत्रक, राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Vimannagar Fire : विमाननगर येथे व्यवसायिक इमारतीतील सहाव्या मजल्यावरील कार्यालयाला आग

SRH vs LSG Live Score : संथ खेळपट्टीवर लखनौ सुस्तावली; अर्धशतकासाठी उजाडलं 9 वं षटक

SCROLL FOR NEXT