Ed Sheeran reveals he has his own grave dug out in his backyard  Esakal
मनोरंजन

Ed Sheeran: प्रसिद्ध गायकाने मृत्यूपुर्वीच खोदून ठेवलंय स्वत:चं थडगं! कारण सांगत म्हणाला

Vaishali Patil

Ed Sheeran News: हॉलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय गायक आहेत. त्याच्या आवाजाने त्यांनी तरुण पिढीवर छाप सोडली आहे. यातच एक प्रसिद्ध नाव आहे ते हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक एड शीरनचं. 'शेप ऑफ यू' या गाण्याने जगाला वेड लावणाऱ्या शीरनने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. शीरनने त्याच्या मृत्यूपुर्वीच स्वत:चं थडगं खोदलं आहे.

शीरनने त्याच्या घराच्या मागच्या अंगणात एक मोठा खड्डा खोदला आहे आणि कुटुंबातील सदस्यांसाठी एक प्रार्थना कक्ष आणि एक खोलीही बनवली आहे जिथे ते आराम करू शकतात. शीरनने हे का केले याबद्दलही त्याने खुलासा केला आहे. त्याच्या घरच्या सदस्यांना त्याची कबर सहज सापडेल आणि त्याच्या मृत्यूनंतर त्यांना काही त्रास होणार नाही यासाठी त्याने हे केले आहे.

32 वर्षीय गायक एड शीरनला असं यासाठी केलं कारण त्याची अशी इच्छा आहे की मृत्यूनंतर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला एकाच ठिकाणी दफन करावे. हे तळघर नाही. त्याच्या कुटुंबातील सदस्यांना एकत्र ठेवण्याच्या कल्पनेमुळे त्याने असा विचार केला आहे.

शीरनने त्याच्या घराच्या मागच्या अंगणात मोठा खड्डा करून त्यावर छोटासा दगड ठेवला आहे. गायक म्हणतो की, "जेव्हा तो दिवस येईल, जेव्हा मी मरेन, तेव्हा मला तिथेच गाडलं जाईल. माझं असं बोलणं विचित्र असू शकते, माझे बरेच मित्र मृत्यूपत्र तयार न करताच मरण पावले आणि आता काय करावे हे कोणालाही माहिती नाही." शीरनने ती जागा आपल्या कुटुंबीयांना दाखवली आहे.

एड शीरनला चेरी सीबॉर्नसोबत लग्न केले आहे. त्यांना 2 मुले आहेत. ज्यात दोन वर्षाची लिरा आणि एक वर्षाचा ज्यूपिटर आहे. परफेक्ट, शेप ऑफ यू, फोटोग्राफ, थिंकिंग आऊट लाऊड, कॅसल ऑन द हिल आणि बॅड हॅबिट्स यांसारख्या उत्कृष्ठ गाण्यांनी त्याने चाहत्यांची मने जिंकली आहे. शीरनला प्रसिद्ध ग्रॅमी पुरस्कारही मिळाला आहे.

शीरनला त्याच्या गाण्यांसाठी ब्रिट अवॉर्ड्स आणि ब्रिटिश ब्रेकथ्रू अवॉर्ड्स मिळाले आहेत. फोर्ब्सच्या यादीत एड शीरन 751 कोटींच्या कमाईसह पाचव्या स्थानावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: मुंबईनंतर पुण्यातील कबुतर खाद्यबंदीचा वाद उच्च न्यायालयात, थेट पालिकेच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

Amar Kale News: शरद पवारांपाठोपाठ खासदार अमर काळेंचंही खळबळजनक विधान; म्हणाले, 'निवडणूक जिंकण्यासाठी...'

Rahul Gandhi Vs Election Commission: राहुल गांधींनी केलेले 'मत चोरी'चे आरोप अन् निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर; वाचा सविस्तर!

Pune Traffic : लाडक्या बहिणी आणि भाऊ अडकले वाहतूक कोंडीत

Delivery Boy Life: रक्षाबंधनला झेप्टो, स्विगी, ब्लिंकइटने कमवले ढीगभर रुपये, पण डिलिव्हरी बॉयची कमाई किती माहितीये?

SCROLL FOR NEXT